103 वय असलेल्या आजोबांनी उडवला लग्नाचा बार! केलं तिसऱ्यांदा लग्न, वाचा अजब लग्नाची गजब कहाणी…

भोपाळमध्ये एका 103 वर्षीय व्यक्तीने 49 वर्षीय महिलेशी लग्न केले आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. जुन्या शहरातील रहिवासी असलेल्या 103 वर्षीय हबीब मियांचे 49 वर्षीय फिरोज जहाँशी लग्न झाले. या लग्नानंतर आपल्या पत्नीसोबत आनंदी आणि उत्साहाने भरलेला दिसत होते.

हबीब मियाँ यांनी लग्नाला वयाचा संबंध न जोडताना सांगितले की, ही हृदयाची बाब आहे, हृदयात वाव असला पाहिजे, बाकी सर्व काही सोपे आहे. या अनोख्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये मुफ्ती-ए-शहर मोहम्मद अबुल कलाम खान कासमी देखील वधू-वरांना शुभेच्छा देताना दिसत आहेत.

दरम्यान, त्यांचे पहिले लग्न नाशकात झाले होते तर दुसरे लग्न लखनौमध्ये झाले होते. पण काही दिवसांपुर्वीच त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे वृद्धापकाळाने निधन झाले. यानंतर हबीब दुखातून सावरु शकले नाहीत. त्यांना एकटेपणा जाणवत होता.

आपला एकटेपणा घालवण्यासाठी त्यांनी दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला. फिरोज यांच्या पतीचे देखील निधन झाले होते. त्यामुळे त्यादेखील एकट्या आयुष्य व्यतीत करत होत्या. यामुळे त्यांनी देखील याबाबत विचार केला.

हबीब यांच्याकडे लक्ष द्यायला कोणी नव्हत म्हणून मी या लग्नाला होकार दिल्याचे फिरोज सांगतात. प्रेमाला वय नसतं असंही ते सांगतात. यामुळे या लग्नाची मोठी चर्चा सध्या सुरू झाली आहे.

भारतात 20 ते 30 या काळात शक्यतो लग्न केलं जातं. 50 वय असेल आणि लग्न केले तर याची खूप चर्चा होते. असे असताना या आजोबांच्या लग्नाची किती चर्चा झाली असेल, याचा विचार न केलेलाच बरा. त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच काहींनी टोमणे देखील मारले आहेत.