राजस्थानच्या कोटा परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिक्षण नगरी म्हणून ओळखले जाणाऱ्या कोटा शहरातील बजरंगनगर परिसरात इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने त्याच्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
कृपांगी असे या तरुणीचे नाव आहे. कृपांगी तिच्या मामाच्या घरी राहत होती. तिचे वडिलही तिच्यासोबत तिथेच राहत होते. तिच्या वडिलांनी तिला मोबाईल फोन वापरण्यास नकार दिला. यामुळे ती नाराज झाली होती. नंतर ती तिच्या खोलीत गेली.
पोलिसांनाही याबाबत सूचना दिली. पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी दरवाजा तोडून आत जाऊन पाहिले तर कृपांगीने गळफास घेतला होता. याबाबत पोलिसांनी सगळ्यांची चौकशी केली. यावेळी मोबाईलचे धक्कादायक कारण समोर आले आहे.
नंतर मात्र, खूप वेळ झाला तरी कृपांगीच्या खोलीतून काहीच आवाज आला नाही. म्हणून तिच्या आजीने दरवाजा वाजवला. मात्र, आतून काहीच आवाज आला नाही. यामुळे तिला शंका आली. त्यांनी इतरांना याबाबत माहिती दिली.
त्यावेळी तिच्या वडिलांची चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, परीक्षा जवळ आल्याने मी तिला मोबाईल फोन देण्यास नकार दिला होता. याआधीही तिला सतत फोन वापरते म्हणून मी ओरडलो होतो, असे काही होईल असे मला वाटलं नव्हतं असेही ते म्हणाले.
या घटनेने तिच्या कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. मात्र मोबाईलमुळे आजकाल तरुण कोणत्या थराला जात आहेत. हे या प्रकरणावरून दिसून आलं आहे.