रत्नागिरीत एक दुःखदघटना घडली आहे. गुहागर तालूक्यात गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणूकीत दोघांचे निधन झाले आहे. पाचेरी आगारातून विसर्जन मिरवणूक रस्त्यावर जात असताना टेम्पो थेट मिरवणूकीत घुसला. या घटनेत दोन जणाचा दुदैवी मृत्यू झाला आहे.
यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. गुहागर तालुक्यात पाचेरी आगर येथे अनंत चतुर्दशी निमित्त गणपती विसर्जन मिरवणूक सुरू होती. यावेळी टेम्पो व दोन गणपती तसेच समोर ड्रायव्हर बरोबर एक 17 वर्षाची मुलगी कोमल भुवड बसली होती.
विसर्जन मिरवणूक सुरू असताना टेम्पोचे ब्रेक फेल झाला. यामुळे टेम्पो उताराच्या दिशेने पुढे जाऊ लागला. मात्र हा प्रकार टेम्पो चालकाच्या लक्षात येताच त्याने टेम्पोमधून उडी मारून थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो थांबला नाही आणि अंगावरून गेला.
तसेच समोर नाचत असलेल्या लोकांना या टेम्पोने जोरदार धडक दिली. यामध्ये कोमल नारायण भुवड (वय 17) आणि टेम्पो चालक दीपक लक्ष्मण भुवड (वय 48) या दोघांचा दुदैवी मृत्यू झालाय, तर पाच जण गंभीर जखमी आहे.
या घटनेची माहिती कळताच गुहागर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा तपास सुरु केला आहे. मुलीचा डोक्याला गंभीर दुखावत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, यामधील जखमी झालेल्या चालक दीपक भुवड याला जवळच्या आबलोली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र अधिकच्या उपचारासाठी त्याला डेरवण येथे हलवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याचे निधन झाले