---Advertisement---

शाळेत जाणाऱ्या १४ वर्षीय मुलीला प्रेम करणं पडलं महागात; आयुष्यच झालं उद्धवस्त, पहा नेमकं काय घडलं

---Advertisement---

ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १६ वर्षीय विद्यार्थ्याने एका १४ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. आणखी धक्का देणारी गोष्ट म्हणजे १४ वर्षीय मुलगी दोन महिन्याची गर्भवती असल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी ठाणे जिल्ह्यातील शीळ डायघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोक्सो कायद्या अंतर्गत त्या १६ वर्षीय विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी ही शीळ डायघर या पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका शाळेत शिक्षण घेत आहे. त्याच परिसरात असलेल्या एका महाविद्यालयात एक १६ वर्षांचा अल्पवयीन मुलगा शिक्षण घेत होता.

त्या मुलाची आणि तिची ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले होते. शाळा-महाविद्यालयात चाललोय असे सांगून ते एकमेकांना भेटायचे. पण दोघांच्याही कुटुंबियांना त्यांच्या प्रेमप्रकरणाबद्दल माहिती नव्हते.

अशात त्या मुलाने त्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला भेटून तिच्यावर अत्याचार केला. पण त्यातून काय होईल याची कल्पना देखील दोघांना नव्हती. अशात काही आठवड्यानंतर त्या मुलीच्या पोटात दुखू लागले होते. घरच्यांनी तिला रुग्णालयात नेले असता ती दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले.

घरच्यांनी तिची चौकशी केल्यानंतर घडलेल्या सगळ्या गोष्टी तिने सांगितल्या. त्यानंतर कुटुंबाने मुलीला घेऊन पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी त्या मुलावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आता याप्रकरणाचा तपास करत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---