गुरांना चारा घालण्यासाठी गोठ्यात गेल्या सासू-सुना, तिथे घडलेल्या भंयकर घटनेने संपुर्ण गावच हादरलं

कोल्हापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरांना चारा घालण्यासाठी गेलेल्या सासू-सुनाला विजेचा शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला आहे. आनंदी मोरबाळे (७०) आणि सुनिता मोरबाळे (४०) असे त्यांचे नाव आहे.

शुक्रवारी संध्याकाळच्या वेळेस ही घटना घडली आहे. त्या करवीर तालुक्यातील महाळुंगे गावातील रहिवासी होत्या. या घटनेमुळे मोरबाळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तसेच गावातील लोक हळहळ व्यक्त करताना दिसून येत आहे.

शुक्रवारी सासू आनंदी मोरबाळे, सुन सुनिता मोरबाळे आणि धाकटा मुलगा नागोजी मोरबाळे हे तिघेही गोठ्यात गेले होते. दुध काढण्यासाठी आणि गुरांना चारा घालण्यासाठी ते तिघेही तिथे गेले होते. दुधाचा व्यवसाय असल्यामुळे ते रोज दुध काढण्यासाठी यायचे.

त्यावेळी नागोजी यांनी गाईचे दुध काढले. दुध काढून झाल्यानंतर मुलगा डेअरीमध्ये देण्यासाठी दुध घेऊन गेला. त्यावेळी सासू-सूना या गोठा आवरत होत्या. त्यावेळी गोठा स्वच्छ करण्यासाठी त्यांनी कडबाकट्टी मशीन सुरु केली.

मशीन सुरु करत असतानाच त्या दोघांनाही विजेचा शॉक लागला. खुप वेळ झाला त्यामुळे घरी आल्या नाही म्हणून धाकटी सून नीता गोठ्याकडे गेली. त्यावेळी तिने जे पाहिलं ते पाहून तिला धक्काच बसला. त्यानंतर तिने आरडाओरड करण्यास सुरुवात केली.

नीता यांचा आवाज ऐकून शेजारी असलेले सुधाकर पाटील तिथे धावून आले. विजेचा धक्का लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे कळताच त्यांनी ते मशीन बंद केले. त्यानंतर लगेचच त्यांच्या मुलांना घटनास्थळी बोलावून घेतले. याप्रकरणी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली असून त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.