Narhari Zirwal : आम्ही २५ आमदार मंगळवारी पक्षप्रमुखांकडे राजीनामा देणार; नरहरी झिरवाळांची मोठी घोषणा

Narhari Zirwal : : आदिवासीतून कुणाला आऱक्षण देता कामा नये. आम्हाला ४७ जाती म्हणून आरक्षण मिळाले. पण ४८ वी जात आरक्षणात घेतली जाऊ नये. आपल्याला रडायचं नाही, तर लढायचं आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

आम्ही सर्व आदिवासी आमदार मंगळवारी पक्षप्रमुखांकडे राजीनामा देणार आहोत. आम्ही 25 जणांनी मनावर घेतले तर कुठलच सरकार राहणार नाही. सगळे आमदार राजीनामा देतील, असा इशारा नरहरी झिरवाळ यांनी दिला. यामुळे आता ते काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याबाबत ते म्हणाले, मला वर बसून मुद्दे मांडता येत नाही, म्हणून मी यांना मुद्दे मांडायला देतो. आता आपल्याला डोक्याने लढायचे आहे. आदिवासी बांधवांचा उलगुलान मोर्चा नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दाखल झाला. या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. त्यावेळी नरहरी झिरवाळ बोलत होते.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात आरक्षणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. त्यांची विराट सभा होणार आहे.

तसेच भाजप आमदार गोपीचंद पडळकर देखील धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यभर दौरे करत आहेत. यामुळे आता राज्यात मोठ्या प्रमाणावर वातावरण तापले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.