दारु पिल्यानंतर लोकांना शुद्ध नसते. दारुच्या नशेत कोण काय करेल हे सांगता येत नाही. काही लोक तर शिवीगाळही करतात. त्यामुळे लोक अशा मद्यपेयींपासून लांबच राहणे पसंत करतात. अशीच एक घटना आता परभणीतून समोर आली आहे.
तीन दारु पिलेले प्रवासी बसमध्ये बसलेले होते. त्यावेळी बस निघाली असता त्यांनी तिथे चांगलाच गोंधळ घातला. त्यामुळे प्रवाशांनी भरलेली बस अर्धा तास रोखावी लागली. त्यांनी एकदम फिल्मी डायलॉगबाजी करत बसचालक आणि कंडक्टरशी वाद घातला होता. काही लोकांनी याचा व्हिडिओही काढला होता. तो व्हिडिओही आता व्हायरल होत आहे.
दारुड्यांची डायलॉगबाजी हा लोकांसाठी विनोदाचा विषय बनला आहे. त्यांचा व्हिडिओ काढतानाही लोकं हसत होते. पण खुप वेळ वाद घातल्यानंतर बसचालकाने पोलिसांना याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर त्यांनी त्या तिन्ही जणांवर कारवाई केली आहे.
जवळपास अर्धा तास तिघांनी एसटी थांबवली होती. तिघे दारु पिलेले होते, त्यामुळे प्रवाशांनी त्यांच्याशी बोलणं टाळलं होतं. पण बसचालक आणि कंडक्टर त्यांना बसमधून उतरवण्याचा प्रयत्न करत होते. पण ते दारु पिलेले असल्यामुळे कोणाचे ऐकत नव्हते.
त्या तिन्ही जणांची डायलॉगबाजी चर्चेचा विषय ठरली होती. सरकार आमचं आहे, लोकशाही आमची आहे, असे डायलॉग ते मारत होते. त्यामुळे सगळे प्रवासी लोटपोट होऊन हसत होते. त्यांनी असे अनेक डायलॉग मारुन तिथे कॉमेडी केली होती.
त्या तीन लोकांनी परभणीच्या सोनपेठ बसस्थानकावर ही बस थाबंवून ठेवली होती. त्या तीन दारु पिणाऱ्या प्रवाशांनी बसचालक आणि कंडक्टरसोबत चांगलाच वाद घातला होता. शेवटी संतापलेल्या बसचालकाने पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर ते पोलिस घटनास्थळी उपस्थित झाले आणि त्यांनी त्या तिघांवर कारवाई केली.