आयुर्वेदिक कफ सिरप अनेकजण पितात. यामुळे अनेकांना बरं वाटत असे सांगितले जाते. असे असताना गुजरात राज्यातील एका गावात देवदिवाळीच्या सणानिमित्त आयोजित कार्यक्रमात काही जणांनी कफ सिरप प्यायल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.
धक्कादायक प्रकार म्हणजे यातील 5 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना मध्य गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील नडियादजवळील बिलोदरा गावात घटना घडली. याबाबत तपास सुरू आहे.
या कार्यक्रमासाठी इतरही गावातून लोक आले होते. या कार्यक्रमात सिरप प्यायल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली म्हणून त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यामुळे मोठी पळापळ बघायला मिळाली. 5 जणांचा मृत्यू झाल्याने राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे.
दरम्यान, गावात मांडवी कार्यक्रम सुरू असताना लोकांनी सिरप प्यायल्याने त्यांची प्रकृती बिघडली. याबाबत अनेकांच्या तक्रारी आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामुळे याबाबत तपास केला गेला. यानंतर धक्कादायक प्रकार समोर आला.
काही लोकांचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांच्याशी झालेल्या संभाषणात या सर्वांनी संशयास्पद सिरप प्यायल्याची घटना समोर आली. यामुळे सगळेच हादरले आहेत. याबाबत प्रकार उघडकीस येताच राज्य सरकारच्या अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला.
दरम्यान, आयुर्वेदिक सिरप प्यायल्यानंतर संशयास्पद मृत्यू झाल्याने सरकारवरही टीका होत आहे
याप्रकरणी विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. घटनेनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. किशोर नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात आली. किशोरने चौकशीत सांगितलं की, तो एका व्यक्तीकडून सिरप घेत होता.
याबाबत बिलोदरा आणि बागडू गावात काही लोकांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. घटनेनंतर पोलिसांच्या एका पथकाने ताबडतोब तपास सुरू केला. याबाबत त्यांना धक्कादायक माहिती मिळाली. यामुळे आता पोलीस सखोल माहिती घेत आहेत.