ताज्या बातम्याकरीअर

Bihar : ५००० मुलींमध्ये बसून परीक्षा देतोय एकटा मुलगा, पाहून हसतात मुली; नेमका ‘विषय’ काय?

Bihar : बिहारच्या गया जिल्ह्यात सुरू असलेल्या मॅट्रिक परीक्षेत एक अजब प्रकार घडला आहे. जिल्ह्यातील एसएमजीएस कॉलेज, शेरघाटी हे परीक्षा केंद्र केवळ विद्यार्थिनींसाठी निश्चित करण्यात आले होते. मात्र, तांत्रिक त्रुटीमुळे रॉकी कुमार नावाच्या विद्यार्थ्याला ५ हजार मुलींमध्ये परीक्षा द्यावी लागत आहे.

हॉलतिकीटवर ‘Female’ लिहिल्याने गोंधळ

रॉकी कुमारने परीक्षा अर्ज भरताना कोणतीही चूक केलेली नव्हती. मात्र, त्याच्या हॉलतिकीटावर ‘Female’ (स्त्री) असा उल्लेख झाला, त्यामुळे त्याला मुलींसोबत बसण्याची वेळ आली. या संदर्भात त्याने आणि त्याच्या कुटुंबाने तक्रार केली असली, तरी तात्काळ दुरुस्ती शक्य नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्याने परिस्थिती स्वीकारत परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला.

विद्यार्थिनींच्या हशाचा विषय

रॉकी कुमारने सांगितले की, तो परीक्षा केंद्रावर पोहोचताच विद्यार्थिनी त्याच्याकडे पाहून हसू लागतात, त्यामुळे तो अस्वस्थ होतो. मात्र, मॅट्रिक उत्तीर्ण होण्यासाठी त्याच्याकडे कोणताही पर्याय नसल्याने तो परीक्षा देत आहे.

शाळा आणि प्रशासन काय म्हणते?

एसएमजीएस कॉलेज, शेरघाटीचे प्राचार्य एहसान अली यांनी स्पष्ट केले की, हे परीक्षा केंद्र फक्त मुलींसाठी असून, रॉकी हा एकमेव विद्यार्थी अपवाद म्हणून येथे परीक्षा देत आहे.

दरम्यान, जिल्हा शिक्षण अधिकारी ओमप्रकाश यांनी सांगितले की, “अशा तांत्रिक चुका कधी कधी होतात आणि नंतर दुरुस्त केल्या जातात. एका इतर केंद्रावरही असाच प्रकार घडला आहे. शिक्षण समितीला याची माहिती देण्यात आली आहे.”

विद्यार्थ्याचा संयम आणि प्रशासनाची चूक

तांत्रिक त्रुटीमुळे रॉकी कुमारला वेगळ्या परिस्थितीचा सामना करावा लागत असला, तरी त्याने संयमाने परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, शिक्षण विभागाच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांना अशा विचित्र प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे.

Related Articles

Back to top button