Govinda : बॉलिवूड अभिनेता गोविंदा पुन्हा एकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता अहुजा हे अनेक वर्षांपासून वेगवेगळे राहतात, असा खुलासा काही दिवसांपूर्वी सुनिता अहुजाने एका मुलाखतीत केला होता. आता या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे.
गोविंदाच्या अफेअरमुळे संसारात वाद?
*मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोविंदा आणि सुनिता अहुजा *३७ वर्षांच्या वैवाहिक नात्यानंतर वेगळे होण्याच्या तयारीत आहेत. गोविंदाचे एका ३० वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबत अफेअर असल्याची चर्चा आहे, त्यामुळे दोघांच्या नात्यात दुरावा आल्याचे बोलले जात आहे. मात्र, अद्याप गोविंदाने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
१९८७ पासून सुरू झालेला संसार तुटणार?
गोविंदा आणि सुनिताने १९८७ साली लग्न केलं होतं आणि बॉलिवूडमधील एक आदर्श कपल म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या टीना आणि यशवर्धन ही दोन मुलं आहेत. मात्र, अलीकडेच त्यांच्या वैवाहिक नात्यात तणाव निर्माण झाल्याची चर्चा आहे.
या चर्चांमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला असून, गोविंदा यावर काय प्रतिक्रिया देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.