अभिनेत्री प्राजक्ता माळी ही नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते. जुळून येती रेशीमगाठी, नकटीच्या लग्नाला यायचं हं यांसारख्या मालिकेतून प्राजक्ता संपुर्ण महाराष्ट्राला माहिती झाली. त्यानंतर तिने एका वेबसिरिजमध्येही काम केले.
प्राजक्ता सोशल मीडियावरही खुप सक्रीय असते. पोस्ट आणि व्हिडिओ शेअर करत ती आपल्या कामांबद्दल नेहमीच चाहत्यांना सांगत असते. आता तिची एक मुलाखत चर्चेचा विषय ठरली आहे. या मुलाखतीमध्ये तिने आपल्या वडिलांबाबत सांगितले आहे.
आपले वडील हे सीआयडी ऑफिसर होते. त्यामुळे त्यांची शिस्त खुप कडक होती. १० वीपर्यंत आमच्याकडे केबलही नव्हती, असेही प्राजक्ताने या मुलाखतीत सांगितले आहे. तसेच त्यामागचे कारणही तिने सांगितले आहे.
माझ्या आईने मला या क्षेत्रात येण्यासाठी खुप प्रोत्साहन दिलं. ती कायम माझ्या पाठिशी उभी होती. सध्या तीच माझी डान्स अकॅडमी सांभाळतेय. तर माझे बाबा हे सीआयडी ऑफिसर होते. त्यामुळे आमच्या घरात नेहमी शिस्तीचे वातावरण असायचे, असे प्राजक्ताने म्हटले आहे.
माझ्या बाबांना टीव्ही ही गोष्ट अजिबात आवडायची नाही. त्यामुळे १० वीपर्यंत आमच्या घरात केबल नव्हती. मला जेव्हा या क्षेत्रात यायचं होतं तेव्हा बाबा काय म्हणतील असं वाटलं होतं. पण मी परवानगी मागितली तेव्हा तुला आवड आहे ना तर कर असे ते मला म्हणाले, असेही प्राजक्ताने सांगितेल आहे.
माझ्या बाबांनी मला कधीच कशासाठी नकार दिला नाही. कारण मी त्यांची खुप लाडकी आहे. पण घरात टिव्ही नसताना मी अभिनेत्री कशी झाले असा प्रश्न सर्वांनाच पडतो, असेही प्राजक्ताने म्हटले आहे. त्यानंतर ती खळखळून हसताना दिसून आली.