मराठी चित्रपटसृष्टीत अशोक सराफ हे प्रसिद्ध नाव आहे. चाहते त्यांना अशोकमामा सुद्धा म्हणताना. कित्येक वर्षे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य केलं आहे. त्यामुळे त्यांचे अनेक किस्से समोर येत असतात. त्यांच्या मी बहुरुपी या पुस्तकातूनही अनेक किस्से समोर आले आहे.
अशोक सराफांनीच मी बहुरुपी हे पुस्तक लिहिलं आहे. त्यामध्ये त्यांनी अनेक गोष्टींचा उलगडा केलेला आहे. अशात त्यांचा एक किस्सा चांगलाच चर्चेत आला आहे. तो म्हणजे ते श्रावणातील प्रत्येक सोमवारी अभिनेते सचिन पिळगांवकर यांच्या घरी जायचे.
बनावाबनवी, आम्ही सातपुते, नवरा माझा नवसाचा अशा अनेक चित्रपटांमध्ये या दोघांनी काम केलं आहे. त्यांच्या अभिनयामुळे आणि विनोदांमुळे त्यांनी त्यांचा एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. या चित्रपटांदरम्यान अशोक सराफ आणि सचिन पिळगांवकर चांगले मित्र झाले होते.
कामाच्या निमित्ताने मी आणि सचिन मित्र बनलो होतो. पण आमची मैत्री खुप घट्ट झाली होती. त्यानंतर मग अनेकदा त्याच्या घरी सुद्धा जायला लागलो. श्रावणामध्ये तर प्रत्येक सोमवारी उपवास सोडायला मी त्याच्या घरीच असायचो, असे अशोक सरांफांनी पुस्तकात म्हटले आहे.
वडील असताना मी सचिनच्या घरी प्रत्येक सोमवारी जायचो. उपवास सोडण्यासाठी माझ्यासाठी सचिनचं घर ही एक खास जागा बनली होती. सचिनची आई मला आवर्जून उपवास सोडण्यासाठी बोलवायची. त्यामुळे मी त्याच्या घरी जायचो, असे अशोक सराफांनी म्हटले आहे.
तसेच त्याच्या घरी येणं जाणं वाढल्यामुळे आमच्या दोघांच्या कुटुंबामध्येही जिव्हाळा वाढला. हे नातं आता आयुष्यभरासाठी झालं आहे, असेही अशोक सराफांनी या पुस्तकात म्हटले आहे. अशोक सराफांची आणि सचिन पिळगांवकरांनी मैत्री खुप खास आहे. आजही ते अनेकदा कार्यक्रमांना एकत्र दिसून येत असतात.