10 वर्षाची मुलगी स्विमिंग पूलमध्ये गेली अन् अमिबाने मेंदू खाल्ला, मुलीसोबत घडलं भयंकर

बोगोटा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी स्विमिंग पूलमध्ये पोहताना अमिबाच्या संपर्कात आल्याने १० वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. घरी परतल्यानंतर दोन आठवड्यानंतर तिला बिछान्यातून उठणंही अवघड झालं.

नंतर एका आठवड्यानंतर तिचे दुःखद निधन झाले. स्टेफानिया विल्यमिझर गोन्झालेझ असे मुलीचे नाव आहे. ती कोलंबियाची रहिवासी होती. या घटनेमुळे तिच्या कुटूंबाला एकच धक्का बसला आहे. जून महिन्यात ती कुटुंबासोबत सुट्टीवर होती.

स्टेफानियाच्या मृत्यूस कारण ठरलेला अमिबा स्विमिंग पूलमधील पाण्यातून तिच्या संपर्कात आला. नईगलेरिया फॉवलेरीचा संसर्ग झाल्यानंतर ९७ टक्के रुग्णांचा मृत्यू होतो, असे डॉक्टरांनी सांगितले. यामध्ये जगण्याचे चान्स खूपच कमी असतात.

यामध्ये नईगलेरिया फॉवलेरीची लागण झाल्यानंतर अमेरिकेत आतापर्यंत केवळ चार जणांचा जीव वाचू शकला आहे. नईगलेरिया फॉवलेरीला सर्वसामान्य भाषेत ब्रेन इटिंग अमिबा म्हटले जाते. यामुळे याचा धोका अधिक असतो.

हा अमीबा प्रामुख्याने ताज्या पाण्यात आढळून येतो. स्टेफानिया स्विमिंग पूलमध्ये असताना त्यावेळी अमिबा तिच्या नाकातून शरीरात गेला असावा, असाही अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे सर्वांनाच एक धक्का बसला आहे.

आम्ही आमच्या सोबत घडलेला प्रकार अधिकाधिक लोकांना सांगत आहोत. अन्य मुलांसोबत, कुटुंबांसोबत असा प्रकार घडू नये हीच आमची इच्छा आहे, असेही तिच्या आईने म्हटले आहे. हा एक धक्कादायक अनुभव होता.