Fire: फायर ब्रिगेडचे जवान रांगत-रांगत वर पोहोचले, समोर कोळसा झालेले ६ मृतदेह अन् कुत्रा; नेमकं काय घडलं?

Fire: छत्रपती संभाजीनगरमधून एक अत्यंत वेदनादायक घटना समोर आली आहे. येथील वाळूज औद्योगिक वसाहतीतील सनशाइन इंटरप्राईजेस या कंपनीला आग लागली. यानंतर आग संपूर्ण इमारतीत पसरली आणि सहा जणांना आपला जीव गमवावा लागला.

मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये एका ज्येष्ठ कामगार आणि एका अठरा वर्षीय युवकाचाही समावेश समावेश आहे. मुश्ताक शेख (वय ६५), कौशर शेख (वय ३२), इक्बाल शेख (वय १८), ककनजी (वय ५५), रियाजभाई (वय ३२), मरगुम शेख (वय ३३) अशी मृतांची नावे आहेत.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, आग इतकी भयंकर होती की ती विझवण्यासाठी त्यांना अनेक तास लागले.

आगीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी धोकादायक कामगिरी केली. मात्र, जेव्हा ते त्या अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचले तेव्हा सारं संपलेलं होतं.

जवान वरच्या मजल्यावरील खोलीत पोहचले तेव्हा त्यांना भयंकर दृश्य दिसले. त्या खोलीत सहा जण मृतावस्थेत पडलेले दिसले. त्यात एक श्वानही होता. श्वानचे पाय वर झाले होते. तेव्हाच जवानांना समजले की, त्याचा मुत्यूव झाला आहे.

आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, काही जणांच्या मते, कंपनीतील इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी. या घटनेमुळे वाळूज औद्योगिक वसाहतीत शोककळा पसरली आहे. वाळूज औद्योगिक परिसरात हँडग्लोज बनवणारी सनशाईन एंटरप्राईज कंपनी आहे.

या घटनेमुळे पुन्हा एकदा औद्योगिक आस्थापनांमध्ये आग लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे औद्योगिक आस्थापनांमध्ये आग लागण्यापासून रोखण्यासाठी आग विझवण्याची यंत्रणा तसेच इतर आवश्यक सुरक्षा उपाययोजना करणे गरजेचे आहे. तसेच, कामगारांनाही आग लागण्याची शक्यता आणि त्यातून स्वतःला वाचवण्यासाठी आवश्यक माहिती देणे गरजेचे आहे.