कुणीतरी पुण्याचा रंग बदलण्याचा प्रयत्न करतंय!! दिग्दर्शक प्रवीण तरडे असं का म्हणाले?

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. देखील भाषण केलं. ‘कुणीतरी पुण्याचा रंग बदलण्याचा प्रयत्न करतंय, असा मोठा दावा प्रवीण तरडे यांनी केला आहे. त्यांनी पुण्यात प्रचारादरम्यान हे वक्तव्य केले आहे.

त्यांचा राग कोणावर होता, याबाबत आता अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. यावेळी प्रवीण तरडे यांनी मुरलीधर मोहोळ यांना सर्वाधिक मतांनी जिंकून आणण्याचं आवाहन पुण्याच्या नागरिकांना केलं. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे देखील उपस्थित होते.

यांच्याबाबत आपल्या मनात असलेला आदरही शब्दांमधून बोलून दाखवला. ते म्हणाले, संस्कृतीचे वरदान आहे त्या माणसासमोर आज बोलावं लागतंय. काही नाही, मी माझ्या मित्रासाठी इथे आलो आहे. मुरलीधर मोहोळ माझा मित्र आहे. मी एवढंच सांगेन, दोस्तीचा हा पॅटर्न आम्हाला सर्वदूर पोहोचवायचा आहे.

माझ्या चित्रपटातील डायलॉग घेऊन मी बोलेन, दोन-दोन वर्ष पाऊस स्वराज्यात पडला नाही तरी थंडीच्या दवावर ज्वारी, बाजरी काढणारी जमात आपली. परिस्थिती जेवढी बिकट, हिंदू तेवढाच तिखट, असे चित्रपटातील डायलॉग देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवले.

हा डायलॉग बोलायचा गरज या व्यासपीठावर यासाठी पडली कारण कुणीतरी पुण्याचा रंग बदलण्याचा प्रयत्न करतंय. पण पुण्याचा रंग इतक्या सहजासहजी बदलू शकत नाही. कारण इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या बापजाद्याने या स्वराज्यासाठी या पुण्यात रक्त सांडलेलं आहे.

दरम्यान, ते म्हणाले, राज ठाकरे आले आहेत. मी एक गोष्ट बोलतो. माझा धर्मवीर चित्रपट आला त्यावेळी त्याच्यातला राज ठाकरेंचा सिनेमातला एक सीन कट झाला, अनेक मनसैनिक माझ्यावर नाराज झाले. राज ठाकरे यांना त्याचं कारण माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील अनेकवेळा आपल्या भाषणात ते सांगितलेले आहे. राज ठाकरे हे आमचे आदर्श आहेत, असेही ते म्हणाले.