---Advertisement---

14 वर्षीय मुलीने स्वतःच्या वडिलांवरच झाडल्या गोळ्या अन् घेतला जीव; कारण ऐकून मुलीचीच येईल दया

---Advertisement---

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातून हत्येची खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे 14 वर्षाच्या मुलीने वडिलांची गोळ्या झाडून हत्या केली. बंदूक तिच्या वडिलांची होती. मुलीने सांगितले की, तिचे वडील तीन महिन्यांपासून तिच्यावर बलात्कार करत होते.

लाहोर शहरातील गुज्जरपुरा भागात ही घटना घडल्याचे लाहोर पोलिसांनी सांगितले आहे. आपण नरक सदृश्य परिस्थितीत जगत असल्याचे मुलीने पोलिसांना सांगितले. तिचे वडील तीन महिन्यांपासून तिच्यावर बलात्कार करत होते.

यामुळे तिने वडिलांना मारण्याचा निर्णय घेतला. तिने तिच्या वडिलांच्या बंदुकीने त्यांच्यावर गोळी झाडली. या प्रकरणाचा तपास करत असलेले पोलीस अधिकारी सोहेल काझमी यांनी सांगितले की, मुलीचा जबाब नोंदवण्यात आला आहे. एकाची नोंद झाली आहे.

या प्रकरणाची प्रत्येक बाजूने चौकशी केली जात आहे. एका अल्पवयीन मुलीवर तिच्या वडिलांना गोळ्या झाडून हत्या करणाच्या एक दिवस आधी पाकिस्तानच्या एका न्यायालयाने बलात्काराच्या एका प्रकरणात मोठा निकाल दिला होता.

शुक्रवारी न्यायालयाने एका बापाला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. लाहोर न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश मियां शाहिद जावेद यांनी आरोपी एम. रफिक याला आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---