Delhi Metro : मेट्रोतून प्रवास करताना महीलेसोबत घडलं भयंकर, साडी दरवाजात अडकली अन्…, आला भयानक मृत्यू

Delhi Metro : दिल्ली मेट्रो ट्रेनचा प्रवास सुरक्षित मानणे चूक असू शकते. दिल्लीच्या इंद्रलोक मेट्रो स्टेशनवर गुरुवारी मेट्रो ट्रेनच्या दरवाज्यात साडी अडकून नांगलोई येथील रहिवासी असलेल्या रीना या ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने ही माहिती दिली आहे. 14 डिसेंबर रोजी मेट्रो स्टेशनवर झालेल्या या घटनेत गंभीर जखमी झाल्याने महिलेला दिल्लीतील सफदरजंग हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, जीवन-मरण यांच्यात संघर्ष करणाऱ्या महिलेने आज अखेरचा श्वास घेतला.

दिल्ली मेट्रोच्या इंद्रलोक मेट्रो स्टेशनवर घडलेल्या या घटनेनंतर दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने चौकशी करण्याबाबत सांगितले आहे. याप्रकरणी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे.

डीएमआरसीच्या म्हणण्यानुसार, सीसीटीव्ही फुटेज आणि घटनेचे पुरावे यावरून माहिती गोळा केली जात आहे. 14 डिसेंबर रोजी महिला आपल्या मुलासोबत इंद्रलोक ते मोहन नगर या मेट्रोमध्ये चढली होती. मात्र ती चढत होती की उतरत होती याबाबत माहिती मिळू शकली नाही.

त्यावेळी महिलेने साडी नेसलेली होती आणि तिच्या हातात बाटली आणि जॅकेट होते. त्यानंतर मेट्रोच्या दरवाजाचे सेन्सर काम करत नसल्यामुळे साडी किंवा जॅकेटचे एक टोक मेट्रो ट्रेनच्या दरवाजात अडकले आणि ते अनेक मीटरपर्यंत ट्रेनसोबत ओढत राहिले.

घटना कळण्यापूर्वीच ट्रेन पुढे गेली आणि महिला मेट्रोच्या ट्रॅकवर पडली. यावेळी महिलेला गंभीर दुखापत झाली. मेट्रो ट्रॅकवर घडलेल्या या घटनेनंतर लगेचच महिलेला दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलच्या न्यूरो विभागाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले.

गंभीर अवस्थेत महिलेवर उपचार सुरू असतानाच शनिवारी तिचा मृत्यू झाला. दिल्ली मेट्रोची ही घटना त्या लोकांसाठी धडा आहे जे मेट्रो ट्रेनचा प्रवास पूर्णपणे सुरक्षित मानून खबरदारी घेत नाहीत.