Crime News: तुझ्या मुलाचा बाप कोण? 16 वर्षांची मुलगी गर्भवती झाल्याने पित्याचा संताप; 60 वर्षीय व्यक्तीचा केला खून

Crime News: उत्तर प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका 16 वर्षाच्या मुलीच्या गर्भाच्या संशयावरून 60 वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मृत व्यक्तीचे नाव रामआसरे कुशवाह असून, ते जलालपूर तालुक्यातल्या न्यूलीवासा गावात राहत होते. त्यांची पत्नीचे नाव गंगाबाई आहे. त्यांना एकूण 8 मुले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल केला आहे. सध्या हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव लक्ष्मण कुशवाह आहे. तो रामआसरे कुशवाह यांच्या शेजारी राहतो. लक्ष्मण कुशवाह यांची 16 वर्षांची मुलगी गरोदर झाली होती. तिच्या कुटुंबाने 1 जानेवारीला तिचा गर्भपात केला होता.

रामआसरे कुशवाह यांच्यावर आरोप आहे की, या मुलीच्या गर्भाचे ते बाप आहेत. या आरोपामुळे लक्ष्मण कुशवाह यांना संताप आला होता. त्याने रामआसरे कुशवाह यांना मारण्याचा कट रचला. 21 जानेवारी रोजी रामआसरे कुशवाह घराबाहेर उभे होते.

त्यावेळी लक्ष्मण कुशवाह कुऱ्हाड घेऊन आला आणि त्यांच्यावर हल्ला केला. त्याने रामआसरे कुशवाह यांच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार केला. रामआसरे कुशवाह या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आणि ते जागीच ठार झाले.

दरम्यान, त्यांचे जावई अरविंदने सांगितलं की, ही अफवा वार्‍यासारखी पसरली. म्हणून आम्ही आमच्या सासर्‍यांना यासंदर्भात विचारले. त्यांनी या गोष्टीला साफ नकार दिला. पण मुलीच्या घरच्यांच्या डोक्यात राग होता. तेव्हा मुलीचा वडील कुऱ्हाड घेऊन आला आणि त्यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी वाचवण्यासाठी आलेला सासूवरही हल्ला केला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी लक्ष्मण कुशवाह याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.