विषारी किड्याला हात लावताच आला हार्टअटॅक, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत घडलं भयंकर

अलीकडच्या काळात हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. अलीकडेच, फिफ्टी शेड्स ऑफ ग्रेचा अभिनेता जेमी डोर्ननला हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिनेत्याच्या मित्राने उघड केले की त्याला हृदयविकाराची लक्षणे आहेत.

पोर्तुगाल दौऱ्यावर असताना त्यांना हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे जाणवली. जेमी डॉर्ननने एका किड्याला हात लावला, पण त्यानंतर जेमीच्या छातीत दुखू लागलं. त्यामुळे त्याला तात्काळ रुग्णलयात दाखल केलं

जेमी डोरनचा मित्र गॉर्डन स्मार्टने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, जेमीला हृदयविकाराची लक्षणे दिसण्यासाठी एक विषारी सुरवंट जबाबदार आहे. जास्त मद्यपान केल्याने त्याची तब्येत बिघडली आहे असे त्याला वाटले, पण नंतर कळले की सुरवंटामुळे त्याच्या डाव्या हाताला आणि खांद्याला एक प्रकारचा संवेदना जाणवत होता.

लक्षणे दिसू लागल्यावर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. जेमीच्या प्रकृतीत किंचित सुधारणा झाल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की, सुरवंटाच्या संपर्कात आल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. हे सुरवंट आरोग्यासाठी कसे घातक ठरू शकतात हे डॉक्टरांनी त्यांना सांगितले.

दरम्यान, जेमीने एका विषारी केसाळ सुरवंटाला (Toxic Caterpillar) हात लावला होता. त्याचं विष जेमीच्या अंगात शिरले. यामुळे जेमीला त्रास झाला आणि त्याला हार्ट अटॅक आला. यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार विषारी सुरवंटामुळे काही श्वानांचा मृत्यू झाला होता.तर काही तरुणांना हार्टअटॅकचा त्रास झाला होता. सुदैवाने जेमी डॉर्ननचा जीव वाचल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.