नववीतील विद्यार्थीनीने बाळाला जन्म दिल्याने उडाली खळबळ, म्हणाली, प्रसूती होईपर्यंत…

कर्नाटकातील चिक्कबल्लापुरा येथील रुग्णालयात या मुलीची प्रसूती झाली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. सरकारी निवासी शाळेत ही धक्कादायक घटना घडली आहे. इयत्ता नववीची विद्यार्थिनीने एका बाळाला जन्म दिला आहे.

तिची प्रसूती होईपर्यंत ती गरोदर होती हेच तिला माहिती नव्हते. याप्रकरणी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे मात्र मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती अशी की, १४ वर्षीय मुलगी कर्नाटकातील तुमाकुरू जिल्ह्यातील सरकारी निवासी शाळेच्या वसतिगृहात राहाते.

तिला अनेक दिवसांपासून पोटदुखीचा त्रास जाणवत होता. तिची पोटदुखी वाढल्यानंतर ती बागेपल्ली तालुक्यातील तिच्या घरी गेली. तिच्या पोटात दुखू लागल्याने घरच्यांनी तिला रुग्णालयात नेले. तिथं तपासणी केली असता ती गरोदर असल्याचे दिसुन आले.

नंतर तिला डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल करून घेत तिची आवश्यक वैद्यकीय चाचणी केली. त्यानंतर ९ जानेवारी रोजी तिची प्रसूती झाली. यामुळे मुलीला धक्काच बसला आहे. याबाबत तिला माहिती नसल्याचे सांगितले जात आहे.

नंतर प्रसूतीदरम्यान मुलीचं वजन कमी होतं, मात्र बाळाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. नंतर बाल कल्याण  समितीने मुलीचे समुपदेशन केले. यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे.

यावेळी ती म्हणाली, तिच्या वरच्या वर्गात असलेल्या मुलाने तिच्यावर शारिरीक संबंध ठेवले होते. त्यामुळे ती गरोदर राहिली. मात्र तिला याबाबत कसलाही अंदाज नव्हता. पुढे अस काही होईल. परंतु, या मुलाने हे आरोप फेटाळले. यामुळे चौकशी सुरू आहे.