Aadesh bandekar : आदेश बांदेकर हे नाव राज्यात प्रत्येकाच्या घराघरात पोहोचले आहे. होम मिनिस्टर या कार्यक्रमातून ते सर्वांच्या मनावर राज्य करतात. असे असताना त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक घडामोडींवर भाष्य केले आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे.
याबाबत एका मुलाखतीत ते म्हणाले, एकदा होम मिनिस्टर कार्यक्रमाचे चित्रीकरण संपवून घरी निघालो होतो. सिन्नरच्या पुढे अचानक एक गाय आमच्या गाडीच्या समोर आली. आम्ही गाडी थांबवली. यावेळी पाऊस प्रचंड होता. पाच ते सात मिनिटं झाली गाय बाजूलाच होईना.
नंतर काही मिनिटांनी गाय थोडी बाजूला झाली. आम्ही वाट काढत पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर आम्हाला एक मुलगा भेटला. तो म्हणाला, साहेब शंकराच्या देवळात जा ना. त्या मुलाने आम्हाला असा बोलण्याचा काहीच संबंध नव्हता. पण तो मुलगा म्हणाला म्हणून आम्ही पावसात शंकराच्या मंदिरात गेलो.
नंतर पुढे आम्ही आमच्या मार्गाने निघालो. पुढे घोंगडी घातलेला एक ग्रहस्थ शेतकरी गाडीच्या समोर आले. आम्हाला हात दाखवत त्यांनी गाडी थांबवली. ते मला म्हणाले, इथून गाडी पुढे नेऊ नका दुसऱ्या मार्गाने जा. नदीवरचा पूल वाहून गेला आहे.
असे असताना मात्र तेव्हा आम्ही विचार करू लागलो. आम्हाला असं वाटलं की, ती 20 मिनिटं आम्ही थांबलो नसतो तर आयुष्यामध्ये वेगळंच काहीतरी घडलं असत. तेव्हा मात्र दैवी चमत्कार झाला असल्याचा अनुभव आला एवढं नक्की.