Accident News: मोठी बातमी! प्रवाशांनी खचाखच भरलेल्या रिक्षाला अज्ञात वाहनाने उडवले, ८ जणांचा मृत्यू, मृतदेहाचे अक्षरशः तुकडे…

Accident News: अंगाचा थरकाप उडवणारी एक धक्कादायक घटना बिहारमधील लखीसराय जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास घडली.  याठिकाणी प्रवाशांनी खचाखच भरलेल्या रिक्षाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये ८ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ७ प्रवासी गंभीर जखमी झाले. यामुळे मोठी पळापळ झाली. घटनेची माहिती मिळताच याठिकाणी मदतकार्य सुरू करण्यात आले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

यावेळी कुटूंबातील सदस्यांनी मोठा गोंधळ घातला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यामध्ये काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

या घटनेनं परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. या रिक्षामधून १५ प्रवासी प्रवास करीत होते, अशी माहिती आहे. मंगळवारी रात्री लखीसराय-सिकंदरा रस्त्यावरील बिहारौरा गावाजवळ रिक्षा आली असता, अज्ञात वाहनाने समोरून जोरदार धडक दिली, यामध्ये गाडीचा अक्षरशः भुगा झाला आहे.

या घटनेत ८ जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत बचावकार्य केले. तसेच रोडवरील वाहतूक देखील सुरळीत केली. मात्र यावेळी उपस्थित लोकांच्या अंगावर काटा उभा राहिला होता.

सध्या मृतांची ओळख पटवणे सुरू आहे. पोलीस मयताच्या मोबाईल क्रमांकाच्या आधारे त्याच्या कुटुंबीयांना माहिती देऊन त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, काही जखमींची ओळख पटली आहे. याबाबत पुढील तपास सुरू आहे.