भिलवाडा येथे रात्रीचे जेवण करून फिरायला गेलेल्या महिलेचे ओळखीच्या व्यक्तीसह दोघांनी अपहरण करून सामूहिक बलात्कार केला. यानंतर महिला विवस्त्र अवस्थेत घटनास्थळावरून पळून गेली.
बलात्कार पीडित तरुणी 30 मिनिटे रस्त्यावरील लोकांकडे मदत मागत राहिली. पण लोकांना वाटले की ती महीला वेडी आहे. त्यामुळे सर्वांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले. लोकं तिच्यापासून दूर पळू लागले अखेर एका दुचाकीस्वाराने पोलिसांना माहिती दिली.
यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी तिलाला बॅनरमध्ये गुंडाळून पोलीस ठाण्यात आणले. महिलेच्या चौकशीच्या आधारे दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या तरुणांपैकी एक तरुण या महिलेला आधीच ओळखतो.
भीलवाडा येथील गंगापूर येथे शनिवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेवर बलात्कार करण्यात आला होता. पोलिसांनी घटनास्थळावरून एक मोबाईल जप्त केला आहे.
एएसपी विमल सिंह नेहरा यांनी सांगितले की, शनिवारी रात्री 8.40 वाजता एका गावकऱ्याने माहिती दिली की, गंगापूरपासून 6-7 किलोमीटर अंतरावर आमली रोडवरील झुमपूर चौरस्त्यावर एक महिला विवस्त्र अवस्थेत आढळली. जिच्यासोबत सामूहिक बलात्कार झाला.
या माहितीवरून गंगापूरचे एसएचओ जप्ते यांच्यासह तात्काळ घटनास्थळी पोहोचले. तेथे काही लोक उपस्थित होते ज्यांनी महिलेला काही कपडे दिले. पोलिसांनी महिलेला प्लॅस्टिकचा बॅनरही दिला आणि तिला झुमपूर चौकातून गंगापूर रुग्णालयात आणले.
एएसपी म्हणाले की, महिलेची गंगापूर रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून लेखी जबाब घेण्यात आला आहे. यापूर्वी या घटनेत 3 जणांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली होती.
पोलिसांनी पीडितेशी बोलून तपशील तपासला तेव्हा सीडीआरही समोर आला, इतर पुरावे आणि तपासाच्या आधारे असे आढळून आले की या गुन्ह्यात फक्त दोन लोकांचा सहभाग आहे.
एएसपीच्या म्हणण्यानुसार, महिलेने आपल्या जबाबात सांगितले की, शनिवारी संध्याकाळी 7.30 वाजता तिला तिच्या मोबाईलवर छोटू नावाच्या व्यक्तीचा कॉल आला. छोटूने महिलेला भेटायला बोलावले.
पीडितेने छोटूला ओळखत नसल्याचे सांगताच त्याने गिरधारी या महिलेच्या ओळखीच्या व्यक्तीचे नाव सांगितले. महीला गिरधारीला ओळखत होती.
महिलेचे म्हणणे आहे की, ती संध्याकाळी फिरायला बाहेर पडली असता दुचाकीवरून आलेल्या छोटू आणि गिरधारी यांनी तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवले आणि 8 किलोमीटर अंतरावरील आमली रोडवरील झुमपुरा येथील निर्जन स्थळी नेले.
तेथे दोन्ही आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. यानंतर तिला जबर मारहाण करण्यात आली आणि ते तिला चावले. यामुळे पीडित तरुणी घाबरली आणि पाणी पिण्याच्या बहाण्याने विवस्त्र होऊन पळून गेली.
अस्वस्थ झालेली महिला तेथून रस्त्यावर आली आणि सुमारे अर्धा तास लोकांकडे मदत मागत राहिली. यावेळी रस्त्याने जाणाऱ्यांनी तिला घालण्यासाठी कपडे दिले आणि दुचाकीवरून आलेल्या एका प्रवाशाने पोलिसांना माहिती दिली. महिलेच्या लेखी जबाबावरून एफआयआर नोंदवण्यात आला.
रविवारी सकाळी छोटू (वय 42, रा. गणेश सरगरा, रा. गंगापूर आमली) आणि नागजीराम गडरी यांचा मुलगा गिरधारी (30, रा. चिडखेडा) यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरून एक मोबाईल जप्त केला आहे. गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही पोलिसांनी जप्त केली आहे. या प्रकरणाची पाहणी सुरू आहे.