Gashmeer Mahajani : आईला उलट्या, कुजलेल्या मांसाचा वास… काय घडले होते त्या दिवशी? गश्मीरने केला खुलासा

Gashmeer Mahajani : मराठी अभिनेता गश्मीर महाजनी याचे वडील आणि जेष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचं मागील वर्षी जुलै महिन्यात आकस्मित निधन झालं. 15 जुलै 2023 रोजी पुण्यातील राहत्या घरी ते मृतावस्थेत आढळून आले. त्यांच्या या अचानक झालेल्या आकस्मित निधनाने संपूर्ण काळविश्वाला धक्का बसला होता. यानंतर अवघ्या 6 महिन्यानंतर त्यांची पत्नी माधवी महाजनी यांनी चौथा अंक हे आत्मचरित्र प्रकाशित केलं आहे. या पुस्तकात त्यांनी आयुष्यातील बऱ्याचशा आठवणी लिहल्या आहेत.

या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला त्यांचा मुलगा आणि प्रसिद्ध मराठी अभिनेता गश्मीर महाजनी हा उपस्थित होता.यादरम्यान प्रस्तावना वाचताना रवींद्र यांच्या निधनावेळी घडलेल्या घटनेचा एक प्रसंग त्याने सांगितला.

गश्मीर म्हणाला, “पुस्तकाचं नाव काय ठेवायचं याबद्दल आम्ही सगळेजण खूप विचार करत होतो. एकदा आई जुन्या कलाकारांचा किस्सा सांगत असताना ‘चौथा अंक’ असा उल्लेख तिने उल्लेख केला. त्यानंतर खूप विचार करून आम्ही हे नाव अंतिम केलं. ‘चौथा अंक’ हे नाव ठेवलं कारण, १२ जुलै २०२३ रोजी मला आमच्या वॉर्डरोबमधून काहीतरी कुजल्यासारखा वास येत होता. कदाचित तो वास धुवायला टाकलेल्या कपड्यांचा असावा असं मला वाटलं पण, तो वास कुजलेल्या मांसाचा होता. कुठे उंदीर तर मरून पडला नाही ना? म्हणून मी आणि माझ्या बायकोने संपूर्ण वार्डरोब हुडकून काढला. पण, काहीच सापडलं नाही.”

यावेळी बोलताना गश्मीर म्हणाला, “या पुस्तकाचं नाव काय ठेवायचं याबद्दल आम्ही सगळ्यांनी खूप विचार केला. एकदा आई जुन्या कलाकारांचा किस्सा सांगत असताना ‘चौथा अंक’ असा उल्लेख तिने उल्लेख केला होता. त्यानंतर खूप विचार करून आम्ही हे नाव देयचं ठरवलं. ‘चौथा अंक’ हे नाव दिलं कारण, १२ जुलै २०२३ रोजी मला आमच्या वॉर्डरोबमधून काहीतरी कुजल्यासारखा वास येत होता. कदाचित तो वास धुवायला टाकलेल्या कपड्यांचा असावा असं मला वाटलं पण, तो वास कपड्यांचा नसून कुजलेल्या मांसाचा होता. कुठे उंदीर तर मरून पडला नाही ना? म्हणून मी आणि माझ्या बायकोने संपूर्ण वार्डरोब हुडकून काढला होतं. पण, त्यावेळी काहीच सापडलं नाही.”

गश्मीर पुढे म्हणाला, “त्यादिवशी दुपारी मी, पत्नी, आई आणि चार वर्षांचा व्योम आम्ही एकत्र जेवलो. मी आणि व्योम एकमेकांची चेष्टा करत होतो. भाजी, भाकरी, वरण असं सात्विक जेवण केलं होतं. जेवणानंतर अचानक आईला उलट्या व्हायला लागल्या. त्यानंतर महिनाभर आधी आई शुगर लो होऊन पडली होती. तिच्या डाव्या हाताचे बोट खूप सुजलं होतं. शेवटी मी तिला मुंबईत घेऊन आलो अन् महिनाभरात ती बरी झाली. तिच्या गोळ्या सुरू होत्या. सगळी पथ्य योग्यरित्या ती फॉलो करत होती. त्यामुळे अचानक उलट्या सुरू होण्याचं नेमकं कारण काय? हेच मला समजत नव्हतं. मी रात्री व्योमला पाहायला बेडरुममध्ये गेलो तेव्हाही कुजलेला वास मला येत होता.”

आईबद्दल सांगताना तो पुढे म्हणाला, जेव्हा दुसऱ्या दिवशी आईला घेऊन मी डॉक्टरांकडे गेलो. तेव्हा तिच्या उलट्या कमी झाल्या होत्या. तिच्या पोटातील आतडी पार पिळवटून निघाली होती. तिची अशी अवस्था पाहून डॉक्टर देखील चक्रावून गेले. आईला घरी सोडलं आणि मी घाईत आवरून एका मिटींगसाठी निघालो. मी गौरीला घरातील वासाबद्दल सांगितलं, तेव्हा मला असं लक्षात आलं की, तो कुजकट वास फक्त मलाच येत होता. त्याच संध्याकाळी मला तळेगावातील सोसायटीमधून एक फोन आला.

त्यामध्ये घरमालकीनघर बोलत होती ती म्हणाली, “बाबा घराचं दार उघडत नाहीत.” त्यानंतर मी माझ्या पुण्यातील दोन मित्रांना तिकडे पाठवलं. तासाभरात मित्राने फोन करून सांगितलं, “गश्मीर लगेच निघ काका दार उघडत नाहीत आणि घरातून खूप वास येतोय.” बाबांचा आत्मा आम्हाला संकेत देत होता. आईला अचानक सुरू झालेल्या उलट्या, वॉर्डरोबमधून कुजलेल्या मांसाचा फक्त मला येणारा वास हा एक संकेत होता. बाबांचा आत्मा त्यांची पत्नी व मुलाला सांगत होता बाबांनो माझ्या आयुष्यातील ‘चौथा अंक’ आता संपलाय. आता या आणि मला घेऊन जा. बाबा नाटकाचे प्रयोग संपल्यावर चला आता नाटकाचे तीन अंक संपले आता चौथा सुरु असं म्हणायचे. त्यामुळेच माझ्या आईने तिच्या आयुष्यातील हा ‘चौथा अंक’ या पुस्तकाच्या स्वरुपात तुम्हा सर्वांसमोर मांडला आहे.” असं गश्मीरने यावेळी सांगितलं.