एकेकाळी फेरारीतून फिरणारा अभिनेता आता जगतोय ‘असे’ जीवन, घरात राहीलेत फक्त ३ प्लेट, २ मग अन् १ पेन

अभिनेता इमरान खानने बॉलिवूड इंडस्ट्रीतून बराच काळ ब्रेक घेतला आहे. तो लाइमलाइटपासून खूप दूर आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांनी त्याच्या पुनरागमनाची अनेकवेळा मागणी करत आहे. इमरान बऱ्याच दिवसांपासून बॉलिवूड आणि चित्रपटांपासून दूर आहे. गेल्या काही वर्षांत त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक बदल झाले आहेत.

तो पत्नी अवंतिका मलिकपासून वेगळे झाला आहे. असे म्हटले जात आहे की, सध्या अभिनेता अभिनेत्री लेखा वॉशिंग्टनला डेट करत आहे. मात्र, इम्रानने अद्याप याला दुजोरा दिलेला नाही. आमिर खानचा पुतण्या असलेल्या इम्रान खानने बॉलिवूडमध्ये धमाकेदार पदार्पण केले.

जाने तू या जाने ना हा त्याचा पहिला चित्रपट सुपरहिट ठरला. यासोबतच या अभिनेत्याच्या करिअरची सुरुवात चित्रपटसृष्टीत झाली, पण एके काळी ऐषारामी जीवन जगणाऱ्या इम्रान खानचे आयुष्य आता पूर्णपणे बदलले आहे. बॉलिवूडच्या देखण्या अभिनेत्यांमध्ये गणला जाणारा अभिनेता इमरान खान बऱ्याच दिवसांपासून बॉलिवूडमधून गायब आहे.

अलीकडेच आयरा खानच्या लग्नात दिसला होता. त्याच वेळी, आता तो त्याच्या पुनरागमनामुळे चर्चेत आहे.
इम्रान खान यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला आहे. अभिनेत्याने सांगितले की 2016 मध्ये त्याच्या आयुष्यात एक वाईट टप्पा आला आणि त्यानंतर त्याने अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला.

आता त्याला त्याची मुलगी इमराच्या फायद्यासाठी स्वत: ला ठीक करायचे आहे. जेव्हापासून या अभिनेत्याने स्वतःला चित्रपटांपासून दूर केले आहे, तेव्हापासून त्याच्या आयुष्यात बरेच बदल झाले आहेत. गेल्या काही वर्षांत इम्रान खानने आपली करोडोंची फेरारी विकली आणि पाली हिल येथील बंगला सोडून बांदा येथील एका अपार्टमेंटमध्ये राहत आहे.

लक्झरी लाईफ सोडून इम्रान खान साधे आयुष्य जगत आहे. 2016 मध्ये मी एका वाईट टप्प्यातून गेलो, जिथे मला आतून तुटलेले वाटले. सुदैवाने, मी अशा उद्योगात काम करत होतो ज्याने मला आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवले, मला पैशाची काळजी करण्याची गरज नव्हती.

त्याच्या वैवाहिक जीवनाविषयी बोलताना अभिनेता पुढे म्हणाला, मी नुकताच वडील झालो होतो आणि मला वाटले की ते खूप खास आहे. ही गोष्ट मी गांभीर्याने घेतो. मला माझी मुलगी इमरासाठी सर्वोत्कृष्ट व्हायचे आहे. मी ठरवले की आता अभिनेता हे माझे काम नाही.