सलमान खानसंदर्भात अभिनेत्याचे धक्कादायक वक्तव्य, डुक्करासारखं खातो आणि कुत्र्यासारखा…

बॉलीवूडचा दबंग अभिनेता भाईजान सलमान खान नेहेमी चर्चेत असतो. सलमान त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या स्वभावासाठी ही ओळखला जातो. अनेकांना तो मदत करतो. आता सलमानचा खास मित्र विंदू दारा सिंह जो त्याचा खास मित्र आहे. त्याने एक वक्तव्य केले आहे.

त्याने सांगितले की सलमान त्याला मिळणाऱ्या पॉकेट मनीचं नक्की काय करतो. विंदूने सांगितले की सलमान खान म्हणाला होता की ‘त्यानं जेव्हा माझी बॉडी पाहिली त्यानंतर त्याने वर्कआऊट करण्यास सुरुवात केली होती. असा खुलासा देखील त्याने केला.

पुढे तो म्हणाला, मी नेहमीच त्याला एक गोष्ट सांगतो की तो ते जास्त करतोय. तो डुक्करासारखं खातो आणि कुत्र्यासारखा व्यायाम करतो. सलमान जितकं खातो त्यानंतर आम्ही त्याला विचारलं की सगळं जेवणं जातं कुठे? त्यावर त्याचं नेहमी एकच उत्तर असतं की तो त्याला बर्न करतो.

मी खरंच सलमानवर खूप प्रेम करतो. तो खूप चांगला आणि मदत करणाऱ्या व्यक्तींपैकी एक आहे. अस कौतुक देखील त्याने केले आहे. यामुळे याची जोरदार होते. तसेच सलमानला पॉकेटमनी मिळालेल्या पैशांतून सलमान त्याचा असिस्टंट नदीमकडे देतो.

मग त्याचे वडील त्याला 50 हजार देओ किंवा मग 1 लाख. ते सगळे पैसे तो गरीबांमध्ये वाटतो आणि आजही हे असंच सुरु आहे, असाही खुलासा त्यांनी केला आहे. यातून अनेकांना मोठी मदत झाल्याचे देखील त्यांने सांगितले आहे.

सलमान खान आणि तो लहाणपणीचे मित्र आहेत. सलमान एक चांगला माणूसही आहे. सलमान कोटींमध्ये पैसे कमावत असला, तरी आजही तो त्याचे वडील सलीम खान यांच्याकडून रोज पॉकेट मनी घेतो, असेही तो म्हणाला.