उत्तर प्रदेशच्या मेरठमध्येही लग्नाच्या मांडवातच एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी वधु-वरात वाद झाला आणि थेट लग्नच मोडले आहे. दारात लग्नाचा मांडव पडला होता. नवरदेवही वरात घेऊन आला होता. मात्र त्यांचे लग्न झाले नाही.
याबाबत माहिती अशी की, लग्नाच्या विधींना उशीर झाला, या कारणामुळं नवरदेव व नवरीत वाद झाले. नंतर हे भांडण विकोपाला गेले. यामुळे एकमेकांनी दोघांनाही कानशिलात लगावली. यामुळे हा वाद वाढतच गेला. यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र याचा काही फायदा झाला नाही.
या वादामुळं लग्नच रद्द करावं लागले आहे. विशेष म्हणजे त्यांचा प्रेमविवाह होता. वधु दिल्ली येथे खासगी कंपनीत नोकरीला आहे तर तिच्याच कंपनीत नवरदेवही काम करतो. एकाच कंपनीत असल्याने त्यांची ओळख झाली आणि पुढे ते प्रेमात पडले.
सोमवारी त्यांचे लग्न होणार होते. नवरदेव वरात घेऊन वधुच्या घरीदेखील पोहोचला होता. असे असताना लग्नाच्या विधींना काहीसा उशीर झाला त्यावरुन वधु आणि वरपक्षात थोडे वाद होण्यास सुरुवात झाली. वरमालाच्या विधींना उशीर होत असल्याने वधु-वर दोघांचाही रागाचा पारा चढला.
यामुळे वधुने नवरदेवाच्या कानशिलात लगावली. वधु्च्या या कारनाम्याने नवरदेवानेही तिला जोरात कानशिलात लगावली. यामुळे हे प्रकरण वाढतच गेले. प्रकरण इतके चिघळले की दोघांनी लग्न करण्यास नकार दिला. नंतर याठिकाणी पोलीस देखील आले. पोलिसांच्या समोरही दोन्ही पक्षांनी लग्न करण्यास नकार दिला.
यावेळी लग्नाच खर्च झालेले पैसे परत देण्याबाबत चर्चा झाली. वरपक्षाच्या संमतीने पैसे परत देण्यात आले. पोलिसांनी यावेळी सांगितले की अजून कोणीही तक्रार दाखल केली नाही. या प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.