आढळराव-मोहिते पाटलांच जुळलं, पण तिथेच शरद पवारांनी डाव टाकला, अजितदादांना मोठा धक्का…

सध्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण निर्माण झाले असून पुणे जिल्ह्यातील मतदार संघात जोरदार टक्कर होणार आहे. यामध्ये बारामती आणि शिरुर या लोकसभा मतदारसंघात शरद पवार आणि अजित पवार यांच्यात सरळ सामना होत आहे.

यामुळे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यामुळे दोन्ही नेते मैदानात उतरले असून सभा बैठक सुरू आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होत आहे. तर शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात लढाई होत आहे.

असे असताना आता अमोल कोल्हे यांच्यासाठी शरद पवार जोरदार डाव टाकत असल्याचे दिसून आले आहे. शरद पवार यांनी महायुतीला जोरदार धक्का दिला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे यांना चॅलेंज दिल्यानंतर अजित पवार यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांना आपल्याकडे घेत उमेदवारी दिली.

असे असताना आता शिरूर लोकसभा मतदार संघात खेड मध्ये अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात वादाची ठिणगी पडली. मात्र अजित पवारांनी ती कशीबशी मिटवली. यामुळे याचा फायदा आढळराव यांना होईल.

असे असताना खेड तालुक्यातील मोठे नाव असलेले भाजपचे नेते अतुल देशमुख हे मात्र कमालीचे नाराज झाले होते. आपल्याला आता आमदार दिलीप मोहिते- पाटील यांच्या नेतृत्वात काम करावे लागणार असल्याने अतुल देशमुखांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. यामुळे हा एक मोठा धक्का भाजपला बसला आहे.

इतके दिवस दिलीप मोहिते पाटील यांना कायम विरोध केला त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली, आणि आताच्या राजकीय परिस्थितीमुळे आता त्यांच्याच नेतृत्वाखाली काम करणार नसल्याचे देशमुख यांनी जाहीर करत भाजपला सोडचिठ्ठी दिली. यामुळे याठिकाणी रंगत वाढली आहे.

दरम्यान, देशमुख यांची नाराजी हेरत शरद पवार यांनी पुढचा डाव टाकत अतुल देशमुख यांना आपल्या पक्षात घेतले आहे. यामुळे आता याठिकाणी अमोल कोल्हे यांचे पारडे जड मानले जात आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.