सध्या राज्यात अपघाताच्या घटनेत मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. सध्या अशीच एक अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील लिंबेजळगाव परिसरात, दहा वर्षांनंतर बाळाचं बारसं आटोपून पुण्याला परतताना एक भीषण अपघात घडला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
या अपघातात स्कॉर्पिओच्या जोरदार धडकेत सहा महिन्यांच्या बाळासह चौघांचा मृत्यू झाला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींमध्ये बाळ अमोघ देसरकर, त्याची आई मृणाली देसरकर, आजी आशालता हरिहर पोपळघट आणि दुर्गा सागर गिते यांचा समावेश आहे. यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 10 वर्षांनंतर त्यांच्या आयुष्यात बाळ आलं होतं.
याबाबत माहिती अशी की, अमरावतीतील अभियंता अजय देसरकर आपल्या कुटुंबियांसह पुण्याला जात होते. दहा वर्षांनी घरात बाळ जन्माला आल्याने ते बाळाचं बारसं करण्यासाठी एका खास आनंददायी क्षणाची तयारी करत होते. कुटूंबात सगळे आनंदित होते.
असे असताना बारसं आटोपून परतताना लिंबेजळगाव परिसरात त्यांच्या कारला स्कॉर्पिओने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारचे तुकडे झाले आणि एका कुटुंबाचे तीन सदस्य जागीच मृत्यूमुखी पडले. यामुळे सगळेच हादरले असून कुटूंबाच्या आनंदाच्या क्षणाला गालबोट लागले आहे.
दरम्यान, या अपघातामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. स्कॉर्पिओ चालक विशाल ज्ञानेश्वर चव्हाण मद्यधुंद अवस्थेत होता आणि त्याच्याकडे वाहन चालवण्याचा परवानाही नव्हता. त्याच्या सहकारी कृष्णा कारभारी केरेच्या नावावर असलेल्या वाहनामुळे अपघात घडला.
अपघातानंतर स्कॉर्पिओतील चालक आणि एक अन्य प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली असून स्कॉर्पिओ चालक विशाल आणि त्याचा सहकारी कृष्णा यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.
ह्या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, अपघाताचा तपास सुरू आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या अपघातामुळे याठिकाणी मोठी गर्दी झाली होती. माहिती मिळताच पोलीस याठिकाणी दाखल झाले.