ज्येष्ठ अभिनेते रविंद्र बेर्डे यांचे नुकतेच निधन झाले. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. याची बातमी समजताच सिनेसृष्टी हादरली. वयाच्या ७८ व्या वर्षी रविंद्र बेर्डे यांनी अखेरचा श्वास घेतला आणि जगाला निरोप दिला. त्यांनी अनेक कामे केली होती.
कॅन्सरसारख्या आजराशी दोन हात करताना रविंद्र बेर्डे यांची प्राणज्योत मालवली. रवींद्र बेर्डे हे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे भाऊ होते. दोघेही हरहुन्नरी कलाकार म्हणून सर्वांना परिचित होते. लक्ष्मीकांत यांच्या निधनानंतर त्यांच्या लेकाला काका रविंद्र यांचा आधार होता आणि आता अभिनयचा आधारवडचं हरपला आहे.
अभिनय बेर्डे आणि स्वानंदी बेर्डे यांना काका म्हणून रवींद्र बेर्डे यांचा मोठा आधार मिळाला. पण आता काकांच्या निधनानंतर पुतण्या अभिनय आणखीच कोलमडून गेला आहे. आता मोठा दुःखाचा डोंगर त्यांच्यावर कोसळला आहे.
अभिनयने इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करताना काका रविंद्र यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत रविंद्र बेर्डेंसोबत अभिनय आणि स्वानंदी दिसत आहेत. तो भावूक झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
या फोटोमध्ये दोघांनी काकांच्या खांद्यावर हात ठेवला आहे आणि रविंद्र यांनीसुद्धा छान स्माईल दिली आहे. दरम्यान, हा फोटो शेअर करुन अभिनयने काकांना श्रद्धांजली वाहिली आहे. फोटोत रवींद्र बेर्डे आजारपणाशी झुंज देत असल्याचे दिसत आहे. त्यांच्यावर टाटा रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्यांचे निधन झाले आहे.
त्यांना घरी आणल्यानंतर अचानक हृदयविकाराचा झटका आला. रवींद्र बेर्डे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. कला क्षेत्रात त्यांनी अनेक ठिकाणी कामे केली. अनेक चित्रपट काढले. लहान वयातच त्यांनी चित्रपट क्षेत्रात काम केलं.