लग्न झाल्यानंतर तरुणाने व्हायग्रा खाऊन ठेवले पत्नीशी संबंध, नववधूचा मृत्यू, डॉक्टरांनी सांगितल ते भयानक होतं…

लग्न म्हणजे एक नवीन संसार सुरू होत असतो. काहीजण मात्र लग्नाला वेगळ्या पद्धतीने बघत असतात. केवळ शारीरिक गरज म्हणून अनेकजण वेगळे पर्याय बघतात. यामुळे धक्कादायक प्रकार उघडकीस येतात. उत्तर प्रदेशात अशीच एक घटना घडली आहे. येथे एका नवविवाहित महिलेचा विचित्र कारणामुळे मृत्यू झाला आहे.

यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मृत महिलेच्या नातेवाईकांनी तिच्यबाबत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली आहे. तिचा पती सेक्ससाठी शक्ती देणारं औषध घेऊन शारीरिक संबंध ठेवत होता. यामुळे तिचा मृत्यू झाला आहे.

पतीने जास्त सेक्स केल्यामुळे या महिलेचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशातील हमीरपूरमध्ये ही घटना घडली. एका गरिब घरातील या तरुणीचं हमीरपूर येथील तरुणासोबत लग्न झाले होते. लग्न झाल्यानंतर नवविवाहित तरुणी आपल्या पतीसोबत एका लग्नसोहळ्यात गेली होती.

तेव्हा सासरच्या लोकांनी तिच्या भावाच्या पत्नीला फोन केला आणि तुमची मुलगी ही आजारी पडली आहे. तिच्याबद्दल तुम्ही माहिती का लपवली, अशी विचारणा केली. या नवविवाहितेला मोठ्या प्रमाणात उलट्या होत होत्या.

तिला तातडीने एका रुग्णालयात दाखल केले. मात्र तिच्यावर उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. याबाबत डॉक्टर म्हणाले, पीडित महिलेला अंतर्गत गंभीर दुखापत झाली होती. या महिलेशी तिच्या पतीने ज्याप्रमाणे शारीरिक संबंध ठेवले, त्यावरून तिच्यावर गँगरेप झाला आहे, असे वाटत होते. यामुळे कुटूंबाला मोठा धक्का बसला.

दरम्यान, तिचा पती शक्तिवर्धक औषधांचा वापर करत असल्याचे पुढे आले आहे. तो शक्तिवर्धक गोळ्यांचे सेवन करून पत्नीशी अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवत होता. यामुळे पत्नीला याचा मोठ्या प्रमाणावर त्रास होत होता. याबाबत तक्रार दाखल झाल्यावर योग्य ती कारवाई करू, असे पोलिसांनी सांगितले आहे.