मुंबईच्या लाजिरवाण्या पराभवानंतर हार्दिक पांड्याने सांगितले पराभवाचे खरे कारण….

वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स संघाने मुंबई इंडियन्सला सर्वबाद करत २४ धावांनी विजय मिळवला. यामुळे मुंबईसाठी हा एक मोठा धक्का होता. या सामन्यात केकेआर १६९ धावाच करू शकला. नंतर मुंबई इंडियन्सचा संघ १४५ धावांवरच मर्यादित राहिला.

केकेआर संघाने या विजयासह १२ वर्षांनंतर मुंबई इंडियन्सला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करण्यात यश मिळवले आहे. मुंबईचा 8 मॅचमध्ये पराभव झाला आहे. मुंबईने केवळ 3 मॅचमध्ये विजय मिळवला. यामुळे टीमवर तसेच कर्णधार हार्दिक पांड्यावर टीका केली जात आहे.

मुंबई इंडियन्सनं फलंदाजांवर कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे सेहवागने म्हटले आहे. मुंबई संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने या लाजिरवाण्या पराभवानंतर वक्तव्य दिले आहे, तो म्हणाला, ‘आम्ही चांगली भागीदारी करू शकलो नाही आणि सातत्याने विकेट गमावल्या, ज्याचा ट्वेन्टी२० मध्ये फटका बसतो.

तसेच खूप सारे प्रश्न आहेत, पण त्याची उत्तरं मिळायला वेळ लागेल. पण आता बोलण्यासारखं माझ्याकडे फार काही नाही. गोलंदाजांनी खरोखरचं चांगली कामगिरी केली, पहिल्या डावापेक्षा दुसऱ्या डावात खेळपट्टी चांगली झाली, असेही हार्दिक पांड्याने म्हटले आहे.

दरम्यान, या विजयासह कोलकाता नाईट रायडर्सने १० सामन्यांत ७ विजय मिळवून गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे. त्यांचे १४ गुण आहेत. केकेआर प्लेऑफमध्ये पोहोचण्यापासून काही पावले दूर आहे.

दरम्यान, आता काही सामन्यानंतर अंतिम फेरीत कोण जाणार हे पुढे येईल. यामध्ये आता मुंबईची आशा संतपल्यात जमा आहे. यामुळे येणाऱ्या काळात काय होणार हे लवकरच समोर येईल.