---Advertisement---

ब्रेकअप नंतर फोटो डिलीट करायला प्रियकराचा मोबाईल घेतला, गॅलरी पाहून तरुणीच्या पायाखालची जमीनच सरकली

---Advertisement---

प्रेमी युगलाच्या नात्यामधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या तरुणाने आपल्या मोबाइलमध्ये गर्लफ्रेंडसह इतर तरुणींचे तब्बल १३ हजार नग्न फोटो ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

वाद झाल्यानंतर सदर तरुणाच्या २२ वर्षीय गर्लफ्रेंडने त्याचा मोबाइल तपासला असता हा प्रकार समोर आला. आदित्य संतोष (वय. २५) असे आरोपी तरुणाचे नाव असून त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. बेलंदूर शहरातील एका खासगी कंपनीतील २२ वर्षीय तरुणीचे तिच्यासोबत काम करणाऱ्या आदित्य संतोष या तरुणासोबत मागील चार महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. मात्र त्यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाला. यामुळे तिने सगळं काही बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

त्यामुळे तरुणीने आदित्यच्या मोबाइलमधील स्वत:चे फोटो डिलिट करण्यासाठी त्याचा मोबाइल घेतला. मात्र त्यानंतर तिला मोठा धक्का बसला. आदित्य याच्या मोबाइलमध्ये तिच्यासह इतर तरुणींचे तब्बल १३ हजार नग्न फोटो होते. हे नग्न फोटो बघून तिला धक्काच बसला आहे.

यामुळे घाबरलेल्या तरुणीने याबाबत आपल्या वरिष्ठांना कल्पना दिली. तसेच कंपनीतील इतर तरुणींच्या बाबतीत असा प्रकार होऊ नये, म्हणून आदित्य संतोष याच्याविरोधात कारवाई करावी, अशी मागणी केली. याबाबत पोलीस तपास सुरू आहे.

नंतर कंपनीच्या वरिष्ठांनी (ता. २३) रोजी आदित्य संतोष याच्याविरोधात सायबर पोलिसात तक्रार दिली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे. यामुळे मात्र ही तरुणी चांगलीच घाबरली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---