Ajit pawar : सध्या राज्याचा राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. लवकरच राज्यात निवडणुका पार पडणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांना धक्क्यांवर धक्के दिले आहेत. यामुळे याची जोरदार चर्चा सुरू आहे.
अशातच आता अजित दादांना घरातूनच विरोध असल्याचे बोलले जात आहे. अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार हे आता शरद पवार यांच्यासोबतच जाणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. यामुळे आता बारामतीमधून अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
युगेंद्र पवार बारामतीतील खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचार कार्यालयास भेट देऊन शरद पवार गटातील कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत, अशी माहिती शरद पवार गटाचे बारामती शहराध्यक्ष अँड. संदीप गुजर यांनी ही माहिती दिली आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे.
अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे युगेंद्र पवार हे चिरंजिव असून ते सक्रीय राजकारणात नाहीत. युगेंद्र पवार हे विद्या प्रतिष्ठान संस्थेचे खजिनदार आहेत. बारामती तालुका कुस्तीगीर संघाचेही ते काम पाहतात. मात्र ते देखील आता मैदानात उतरले आहेत.
व्यावसाय क्षेत्रात ते काम करतात. पण आता ते सुप्रिया सुळे यांच्या बाजूने प्रचार करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मध्यंतरी बारामतीच्या मेळाव्यात अजित पवार यांनी आपले कुटुंब एकटे पडले असल्याचा उल्लेख केला होता, त्यांचे सख्खे पुतणेच आता शरद पवार यांच्यासोबत जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
यामुळे आता बारामती राजकीय वातावरण चांगलंय तापलं आहे. लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. यामुळे आता सर्वच पक्ष आणि सर्वच उमेदवार हे कामाला लागले आहेत. यात सर्वांचे लक्ष हे बारामतीकडे लागले आहे.