शरद पवारांनी डाव उलटवला! राष्ट्रवादीचे सर्व मंत्री शरद पवारांच्या भेटीला, राजकारणात खळबळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडले आहे. एक गट शरद पवारांचा आहे तर दुसरा गट अजित पवारांचा आहे. असे असतानाही शुक्रवारी अजित पवार शरद पवारांचे निवासस्थान सिल्वर ओकवर गेले होते. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. तसेच अनेक प्रश्नही उपस्थित झाले होते.

असे असतानाच आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीत उभी फुट पडलेली असताना आज अजित पवारांसह शपथ घेतलेले राष्ट्रवादीचे अनेक मंत्री शरद पवारांच्या भेटीला गेले आहे. ते शरद पवारांची भेट घेण्यासाठी वाय बी चव्हाण सेंटरला गेले आहे.

अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ तसेच अजित पवार गटातील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनीट तटकरे सुद्धा शरद पवारांना भेटायला गेले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

अजित पवार आणि त्यांचे मंत्री शरद पवारांच्या भेटीला येत आहे, याबाबत जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांनाही माहिती मिळाली आहे. त्यामुळे ते सुद्धा वाय बी सेंटरकडे रवाना झाले आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी बैठक आयोजित केली होती. ती बैठक अर्धवट सोडून ते गेले आहे.

अनेक नेते अजित पवार यांच्यासोबत सत्तेत गेले आहे. तसेच त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनी शपथ घेतली असून त्यांना मंत्रिपदही देण्यात आले आहे. असे असतानाही ते शरद पवारांकडे आल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. या दोन गटांच्या मनोमिलनासाठी पुन्हा प्रयत्न सुरु झाले आहेत का? अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दरम्यान, नुकतीच अजित पवार यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यांनी याबाबत स्पष्टीकरणही दिले होते. सिल्वर ओकवर जाऊन दिलेली भेट ही कौटुंबिक भेट होती. काकींचे ऑपरेशन झाल्यामुळे मी त्यांना भेटायला गेलो होतो. तिथे शरद पवार साहेबही होते. त्यांच्याशीही मी बोललो. पण आमची राजकारणावर चर्चा झाली नाही, असे अजित पवारांनी म्हटले होते. पण आता त्यांच्यासह अनेक मंत्रीही शरद पवारांच्या भेटीला गेल्याने अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे.