Amol shinde : संसदेत आंदोलन करणाऱ्या अमोल शिंदेबाबत धक्कादायक माहिती आली समोर, घराबाहेर राहतो अन्…

Amol shinde : आज दिल्लीतील संसद भवणावर मोठा गोंधळ निर्माण झाला होता. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. याठिकाणी काही तरुण अचानक संसदेत घुसले. यावेळी खासदारांची मोठी पळापळ निर्माण झाली.

लोकसभेच्या सभागृहात कामकाज सुरू असताना दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून खासदारांची आसनव्यवस्था असलेल्या बाकांवर उड्या मारल्या. खासदार बसलेल्या बाकांवरून उड्या मारत ते पुढे पोहोचले. या तरुणांनी धुराच्या नळकांड्या फोडल्या. यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या तरूणांना खासदारांनी पकडले आणि त्यांना सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिले. मात्र हे तरुण याठिकाणी गेलेच कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता या सर्व तरुणांची ओळख पटली आहे. संसदेच्या बाहेर आंदोलन करणारा अमोल शिंदे हा तरुण लातूरचा आहे.

तो पोलीस भरतीची तयारी करत होता, अशी माहिती समोर आली आहे. त्याने हे आंदोलन कशासाठी केले याबाबत आता पोलीस चौकशी करत आहेत. पोलीस अमोलच्या घरी पोहोचले असून, त्याच्या आई-वडिलांची चौकशी करत आहेत.

दरम्यान, संसदेत आज कामकाज सुरू असताना प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या दोन तरुणांनी खासदारांच्या बाकावर उड्या मारल्या. एका बाकावरून दुसऱ्या बाकावर उड्या मारत हे तरूण खासदाराच्या जवळ पोहोचले. यामुळे मोठा गोंधळ उडाला.

यावेळी एकाने आपल्या बुटातून स्प्रे काढत सभागृहात धूर केला. संसदेच्या बाहेर देखील काही तरुणांनी धुराच्या नळकांड्या फोडल्या. यामुळे सुरक्षा यंत्रणा देखील हादरली. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबाबत चौकशी केली आहे.