Amravati News : कुटुंब अंगणात गप्पा मारत बसलं होतं, अचानक घडलं भयंकर, घरातील तिघांचा जागीच मृत्यू

Amravati News: अमरावतीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. येथील दर्यापूर तालुक्यातील नाचोना या गावात वास्तव्य करत असणाऱ्या सामान्य गरीब कुटुंब आज रात्री आठ वाजताच्या सुमारास आपल्या अंगणात गप्पागोष्टी करत होते. मात्र तेव्हाच एक भयंकर घटना घडली आहे.

यावेळी गावातील अवैधपणे दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीने जुन्या वादातून रागाच्या भरात त्यांचे चारचाकी वाहन चक्क घराच्या अंगणात आणून वृद्ध आणि महिलांच्या अंगावर घातले. या घटनेत तीन जण जागीच ठार झाले. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

या घटनेत तीन गंभीर जखमी झाले आहेत. नाचोना या गावात हा भयंकर प्रकार घडला आहे. या घटनेची माहिती मिळताच अमरावती जिल्हा शिवसेनाप्रमुख गावात पोहीचल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र याठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेतील जखमींना रुग्णालयात तातडीने भरती केले आहे. या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. दरम्यान, जुन्या वादातून ही घटना झाली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मृतकांना शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.

याबाबत नातेवाईकांनी पोलिसांवर आरोप केले आहेत. या घटनेत अनुसया शामराव अंभोरे (६७), शामराव लालूजी अंभोरे (७०), अनारकली मोहन गुजर (४३) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, या घटनेतील मृत लोकांच्या अंगावर तलवारी आणि चाकूच्या जखमा होत्या. याबाबत तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दर्यापूर यांच्या आदेशाने दर्यापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष टाले आणि खल्लार पोलीस स्टेशन करत आहेत. या घटनेने मात्र खळबळ उडाली आहे.