रामलल्ला सारखी दिसणारी विष्णूची प्राचीन मूर्ती कृष्णेच्या पात्रात सापडली, नंतर शिवलिंगही सापडलं…

कर्नाटकमध्ये रायचूर जिल्ह्यातील एका गावात भगवान विष्णूंची प्राचीन मूर्ती सापडली. या मूर्तीच्या चारही बाजूंना दशावतार कोरण्यात आले आहेत. कृष्णा नदीच्या पात्रात ही मूर्ती सापडली आहे. यामुळे या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी अनेकांनी याठिकाणी धाव घेतली. याची चर्चा सध्या सुरू आहे.

कृष्णा नदीपात्रात सापडलेली भगवान विष्णूंची मूर्ती अयोध्येतील रामलल्लाच्या मूर्तीसारखी आहे. या मूर्तीमध्ये विष्णू उभ्या स्थितीत आहेत. त्यांच्या पाठीमागे प्रभावळ असून त्यावर विष्णूचे १० अवतार कोरण्यात आलेले आहेत. सध्या इतिहास संशोधक याचा अभ्यास करत आहेत.

या मूर्तीसोबत एक प्राचीन शिवलिंगदेखील सापडले आहे. दरम्यान, शिवलिंग आणि विष्णूची मूर्ती १००० वर्ष जुनी असावी असा अंदाज आहे. मूर्ती ११ व्या किंवा १२ व्या शतकातील असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नदीपात्रात सापडलेली मूर्ती एखाद्या आधी एखाद्या मंदिराच्या गाभाऱ्यात असावी, असे म्हटले जात आहे.

मंदिराला नुकसान पोहोचल्यानंतर ती नदीत फेकली गेली असावी, असा अंदाज आहे. ही मूर्ती आणि शिवलिंग आता भारतीय पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात आहे. दरम्यान, अयोध्येतील राम मंदिराचं लोकार्पण २२ जानेवारीला झालं. या मंदिरात रामलल्लाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

तशीच ही मूर्ती असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अयोध्येत जी मूर्ती बनवली आहे ती कर्नाटकातील प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी कृष्णशिला येथे ही मूर्ती तयार केली आहे. आणि ती सेम दिसत आहे.

म्हैसूरचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी काळ्या पाषाणातील 51 इंच उंचीच्या पाच वर्षीय राम लल्लाच्या श्यामल दर्शनाची श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या 11 विश्वस्तांनी एकमताने मूर्ती म्हणून निवड केली होती. यामुळे सध्या याची चर्चा सुरू झाली आहे.