मुंबई जिंकणार नाही म्हटल्यामुळे आला राग, एकाची डोक्यात वार करून हत्या, आयपीएलमुळे अजून एकाचा बळी…

सध्या आयपीएलची स्पर्धा सुरू असून चाहते आपल्या टीमला मोठ्या प्रमाणावर सपोर्ट करत आहेत. अनेक ठिकाणी चाहते केवळ ईर्ष्येपोटी एकमेकांचा जीव घेत आहेत, अशाही अनेक घटना समोर येत आहेत. यामुळे याची चर्चा सुरू आहे. सध्या चाहत्यांमध्ये होत असलेल्या वादाने डोकी फोडण्यापासून ते खुनापर्यंत प्रकरण पोहोचत आहे.

असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोल्हापुरात ‘मुंबई इंडियन्स’च्या चाहत्याने ‘चेन्नई सुपरकिंग्ज’च्या चाहत्यावर हल्ला केला आहे. यातून त्याचा जीव गेला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यामुळे या खेळाचा राग कुठेपर्यत गेला आहे. याचा अंदाज येतो.

कोल्हापूर जिल्ह्यातील हणमंतवाडी येथे गेल्या आठवड्यात एकाच गल्लीत राहणाऱ्या दोन कुटुंबात वाद झाला. वादाचे कारण होते सध्या सुरू असलेली आयपीएल. यातून घटना घडली आहे. याबाबत माहिती अशी की, सागर झांजगे व बळवंत झांजगे हे दोघे काका-पुतण्या.

दोघेही ‘मुंबई इंडियन्स’चे चाहते आहेत. त्यांच्याच गल्लीत राहणाऱ्या गायकवाड यांच्या घरात बसून क्रिकेट बघायचे. यावेळी एक सामना सुरू होता. यामध्ये हैद्राबाद संघाने धावांचा डोंगर रचला. त्यामुळे दोघेही नाराज आणि संतप्त होते.

असे असताना मुंबईचा रोहित आउट झाला. यामुळे ते नाराज होते. असे असताना याठिकाणी चेन्नई सुपर किंग्जचे चाहते असलेले बंडोपंत तिबिले तिथे आले. यावेळी त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. रोहित झाला बाद, आता काय मुंबई जिंकणार,’ असे म्हणून त्यांनी दोघांना डिवचले.

यामुळे अगोदरच रागात असलेल्या झांजगेंना तिबिलेंचा राग आला. यानंतर मोठा राडा झाला. बळवंत झांजगे यांनी तिबिलेच्या डोक्यावर शेजारी असलेली फळी मारली. यामुळे तिबिले तिथेच बेशुद्ध पडले. यामुळे घटनेच्या दुसऱ्या दिवशी त्यांचे निधन झाले. याबाबत दोघांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, बंडोपंत आणि बळवंत हे दोघेही जवळचे मित्र होते. सोबत ते सामने बघायचे ते वेगवेगळ्या संघाचे चाहते होते. गेल्या वर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड येथेही संघाचे फलक लावण्यावरून दोन संघांच्या चाहत्यांमध्ये तुफान मारामारी झाली होती. यावर्षी जीव घेण्यापर्यंत मजल गेली.

यामुळे अशा अनेक धक्कादायक घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. खेळ महत्वाचा आहे. भावनिकता महत्त्वाची नाही. क्षणिक रागापोटी टोकाला जावून आपल्या हातून कोणतेही अतिरेकी कृत्य होऊ नये याची काळजी घ्यायलाच हवी. मात्र अशा घटना या चिंताजनक आहेत.