महाराष्ट्रात आणखी एक पुतण्या बंडाच्या तयारीत, आता एकनाथ शिंदेंना धक्का बसणार…

राज्यात काका पुतण्याचे राजकारण हे अनेकदा आपण बघत आलो आहे. अनेकदा पुतण्या हा वेगळी भूमिका घेतो, अशी अनेक नावे राजकारणात आहेत. आता देखील राज्याच्या राजकारणात पुन्हा एक पुतण्या बंड करण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे. त्याचाच प्रत्यय धाराशिव जिल्ह्यामध्ये येतो की काय? अशी चर्चा आहे.

हा बंड आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत हे करण्याची दाट शक्यता आहे. या बंडाला आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा छुपा पाठिंबा आहे किंवा नाही, याबाबत देखील चर्चा सुरू आहे. तानाजी सावंत यांचे पुतणे धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत हे धाराशिव लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे सांगितले जात होते.

असे असताना त्यांना उमेदवारी भेटली नाही. यामुळे ते प्रचंड नाराज झाले आहेत. ते वंचित बहुजन आघाडीच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे. येणाऱ्या काळात ते याबाबत निर्णय घेणार असल्याचे देखील सांगितले जात आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे.

यामुळे याठिकाणी महाविकासआघाडी विरुद्ध महायुतीविरुद्ध वंचित बहुजन आघाडी असे चित्र पाहायला भेटण्याची दाट शक्यता आहे. तानाजी सावंत हे आपल्या पुतण्याला धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवारी देण्यात ते सपशेल अपयशी ठरले आहेत.

असे असताना भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी आपली पत्नी अर्चना पाटील यांना अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवून देण्यास यशस्वी ठरले. यामुळे ते नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सुरू आहे.

अर्चना पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटातून उमेदवारी जाहीर झाल्यापासून सावंत समर्थक प्रचंड नाराज आहेत. त्यांनी राजीनामा सत्र चालू ठेवले आहे. हजारो कार्यकर्ते धनंजय सावंत यांना भेटून पाठिंबा देत आहेत. अपक्ष लढा असेही ते म्हणत आहेत.

ज्या राष्ट्रवादीच्या विरोधात आम्ही प्रचार केला त्या राष्ट्रवादीचा आम्ही प्रचार करणार नाहीत. त्यांच्या उमेदवाराचा प्रचार आम्ही करणार नाहीत, असं समर्थक सांगत आहेत. यामुळे आता येणाऱ्या काळात याठिकाणी नेमकं काय घडणार हे लवकरच समोर येईल.