पुण्यातील कल्याणीनगरमध्ये दोन जणांचा जीव घेणाऱ्या मुलाला वाचवण्यासाठी सध्या अनेक प्रयत्न केले जात आहेत. आता एक नवीन कांगावा पुढे येत आहे. बिघाड असतानाही पोर्शे कार विशाल अग्रवालने मुलाला चालवायला परवानगी दिली, असा जबाब चालकाने पोलिसांना दिला. परंतु बिघडलेली कार एखादा पिता आपल्या मुलाला कसा देईल, असा प्रश्न कोणत्याही सुज्ञान व्यक्तीला पडेल.
यामुळे या मुलाला वाचवण्यासाठी काहीही करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. पुण्यातील अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे वडील विशल अग्रवालसह तिघांना काल न्यायालयाने 24 मे पर्यंत पोलीत कोठडी सुनावली आले. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
विशाल अग्रवाल यांना पुणे न्यायालयात हजर करण्यात आले. विशाल अग्रवाल यांच्याकडून त्यांचे वकील प्रशांत पाटील यांनी युक्तिवाद केला. विशाल अग्रवाल यांचा बचाव करताना आलिशान पॉर्शे कारमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचा युक्तिवाद करण्यात आला आहे. यामुळे हे केवळ त्याला वाचवण्यासाठी काहीही प्रयत्न केले जात आहेत.
याबाबत विशाल अग्ररवाल यांचे वकील म्हणाले, अपघातापूर्वीत कारमध्ये बिघाड असल्याचे विशाल अग्रवाल यांच्या निदर्शनास आले होते. त्यांनी या बिघाडासंदर्भात कंपनीला माहिती दिली होती. असे असताना कंपनीने त्यांच्या तक्रारीची दखल न घेतल्याने विशाल अग्रवाल यांनी ग्राहक तक्रार निवाारण आयोगात तक्रार केली होती.
दरम्यान, विशाल अग्रवाल यांच्याकडे काम करणाऱ्या ड्रायव्हरने मुलाने कार चालवायला मागितली तर त्याला चालवायला दे, तू मात्र त्याच्या बाजूला बस, अशी सूचना अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी दिल्याचे ड्रायव्हर सांगत आहे. वकिलांची आणि ड्रायव्हरची दोन्ही वक्तव्ये वेगळी वाटतात.
यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. कारमध्ये बिघाड होता तर ती कार आपल्याा पोटच्या मुलाला चालवण्यासाठी कोणते वडिल देतील? असा प्रश्न आता विचारला जात आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.