Ashok Saraf: भाऊ कदम पाया पडले, पण अशोक सराफांनी दिलेली वागणूक पाहून चाहते चिडले, म्हणाले, “मोठा माणूस…

Ashok saraf : मराठी चित्रपट क्षेत्रातले बडे नाव म्हणून अशोक सराफ यांची ओळख आहे. असे असताना आता ते एका व्हिडिओमुळे चांगलेच ट्रोल झालेले पाहायला मिळत आहेत. यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या व्हिडिओत अशोक सराफ यांचे वागणे पाहून अनेकांनी त्यांना ट्रोल केले आहे.

नुकतेच भाऊ कदम यांनी अशोक सराफ यांची भेट घेतली. यावेळी भाऊ कदम आता कुठे राहतो? काम कसं चाललंय अशा त्यांच्या खाजगी गप्पा सुरु होत्या. यावेळी भाऊ कदम अतिशय नम्रपणे अशोक मामांसमोर उभं राहून बोलत असतात.

असे असताना मामांना भाऊ कदमला साधं बसावे असे म्हणू वाटले नाही का? असा प्रश्न अनेकांनी विचारला आहे. अशोक सराफ तसेच गप्पा मारत असताना पाहून भाऊ कदम उभेच असतात. समोर बसायला जागा असूनही ते भाऊ कदम यांना बसा म्हणत नाहीत. यामुळे अनेकजण अशोक सराफ यांना नावं ठेवताना दिसत आहेत.

असे असताना काहींनी त्यांची बाजू घेतली आहे. अशोक सराफ आणि भाऊ कदम यांचा सर्वसाधारण संवाद सुरू आहे. त्यांचा इंडस्ट्रीत मोठा आदर आहे. समोर एवढा दांडगा अनुभव असलेला व्यक्ती बसलेला असताना भाऊ कदम यांनीही उभं राहून त्यांचा आदर राखला आहे, असेही काहींनी म्हटले आहे.

याला लोकांनी वेगळे वळण देऊ नये असे मत काहींनी व्यक्त केले आहे. भाऊ कदम यांचा नम्रपणा त्यांच्याजागी योग्य आहे आणि मामांचे एवढं मोठं नाव असल्याने त्यांचे वागणेही त्यांच्याजागी योग्यच आहे, असे काही जाणकार म्हणतात.

दरम्यान, अशोक सराफ यांचा अभिनय क्षेत्रातला अनुभव खूप दांडगा आहे. मराठी सृष्टीतील अनेक नवख्या कलाकारांच्या कामचं ते नेहमी कौतुक करत असतात. अनेकजण त्यांना आपला गुरू देखील मानतात.