Ayushman Card Scheme: आयुष्यमान कार्ड योजना ही एक फायदेशीर सरकारी योजना आहे. आयुष्यमान योजनेचा थेट फायदा सर्वसामान्यांना होतो. या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना उपचार सुविधा पुरवते. यामुळे अनेकांचे जीव देखील वाचतात.
याद्वारे त्यांना 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मिळू शकतात. सर्वसामान्य नागरिकांसाठी केंद्र सरकार अनेक योजना आणत असते. बऱ्याच जणांना याची माहिती नसते. यामुळे पैसे नसताना अडचणी निर्माण होतात.
अशावेळी याचा भुर्दंड सहन करावा लागतो. जर कोणाकडे आयुष्मान कार्ड असेल तर तो सर्व सरकारी रुग्णालये आणि काही विशिष्ट रुग्णालयांमध्ये त्याचा लाभ घेऊ शकतो. यामुळे ही एक फायदेशीर योजना आहे. अनेकजण याचा लाभ देखील घेतात.
दरम्यान, या योजनेचा लाभ घेण्यासाठी कच्च्या घरात राहणारे, भूमिहीन, अनुसूचित जाती किंवा जमातीचे, ग्रामीण भागात राहणारे, ट्रान्सजेंडर आणि दारिद्र्यरेषेखालील लोक याचा लाभ घेऊ शकतात. त्यांच्यासाठी विशेषतः ही योजना आहे.
या लोकांना योजनेसाठी अर्ज करता येतो. इतर देखील मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून याचा लाभ घेऊ शकतात. यासाठी PMJAY वेबसाइट https://pmjay.gov.in/ वर जा. यानंतर ‘Am I Eligible’ या पर्यायावर क्लिक करा. समोर आलेल्या पेजवर तुमचा मोबाइल नंबर टाइप करा.
कॅप्चा कोड टाका आणि ओटीपी मिळवण्यासाठी ‘जनरेट ओटीपी’ वर जावा. तुमचे राज्य आणि जिल्हा निवडा. तुमचे नाव, रेशनकार्ड नंबर आणि मोबाईल नंबर शोधा. यानंतर तुम्ही किंवा तुमचे कुटुंब या योजनेअंतर्गत पात्र आहे की नाही हे समजू शकेल.
यासाठी तुम्ही कॉल सेंटरला 14555 किंवा 1800-111-565 वर कॉल करू शकता. तुम्ही कार्ड सहजपणे घेऊन जाऊ शकता. तसेच हे कार्ड संपूर्ण भारतात वापरले जाऊ शकते. यामुळे केंद्र सरकारची ही एक फायदेशीर योजना आहे.