बारामतीत राडा! अजित पवार सुनेत्रा पवार यांचे फोटो असलेल्या बॅनरवर शाईफेक, भावी खासदार म्हणून होता उल्लेख…

राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्याने बारामती लोकसभा निवडणुकीत उमेदवारी कोणाला मिळणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उमेदवार असतील अशा चर्चा सुरु आहेत. तर त्यांच्या पुढे विद्यमान खासदार सुप्रिया सुळे या असणार आहेत.

असे असताना सुनेत्रा पवार यांना विजयी करावे आणि अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे फोटो असलेला फलक काऱ्हाटी गावात लावला होता. त्या फलकावर शाईफेक करण्यात आलेली आहे. रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेत ही शाईफेक झाल्याचे समोर आले आहे.

यामुळे या उमेदवारीला विरोध असल्याचे सांगितले जात आहे. शाईफेकीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. फलकावर शाई फेकल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांनी हा फलक उतरवला आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या पक्षातून सुनेत्रा पवार या लोकसभेच्या खासदारकीच्या उमेदवार असणार, असे सांगितले जात आहे. यामुळे अजित पवार यांचे देखील दौरे वाढले आहेत. यामुळे फलक लावले जात आहेत.

एका फ्लेक्स वर काऱ्हाटी गावात शाई फेकल्याने येथील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावर सुनेत्रा पवार भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला होता. सुनेत्रा पवार यांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. यावर अजित पवार यांचा देखील फोटो होता.

दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामतीची जागा अजित पवारांची राष्ट्रवादी लढवेल असे म्हटले आहे. यामुळे अजित पवार घरातील उमेदवार देतील की बाहेरचा उमेदवार देतील यावर सध्या चर्चा सुरू झाली आहे.