भाई जाऊ नका, कार्यकर्त्याने अडवलं, तरीही घोसाळकर आत गेले, प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितला हत्याकांडाचा भयानक थरार…

बोरिवलीमधील एका कार्यकर्त्याने गुरुवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या केली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. फेसबुक लाइव्ह करत हा गोळीबार झाल्याने याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

साडी वाटपाच्या कार्यक्रमासाठी बोलावून मॉरिस नरव्होना या कार्यकर्त्याने घोसाळकर यांच्यासमवेत ‘फेसबुक लाइव्ह’ केला व नंतर अभिषेक यांच्यावर गोळ्या झाडल्या. यामुळे राज्यात नेमकं काय सुरू आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

यानंतर याने स्वतःवरही गोळ्या झाडून आत्महत्या केली. या घटनेनंतर घोसाळकरांना हॉस्पिटलला नेण्यास मदत करणाऱ्या एक प्रत्यक्षदर्शी महिलेने घटनाक्रम सांगितला आहे. यामुळे अंगावर काटा आणणारा हा प्रसंग असल्याचे सांगितले जात आहे.

गोळीबाराचा आवाज ऐकून कार्यालयाबाहेरील कार्यकर्ते, नागरिकांमध्ये, महिलांमध्ये घबराट पसरली होती. काय घडलंय कोणाला समजत नव्हते, सगळे पळत सुटले होते. याबाबत एक महिला म्हणाली, गणपत पाटील नगर येथे शिवसेनेचं ऑफिस आहे. आम्हाला दुपारी ३ वाजता फोन आला की सर्व महिलांनी तिथे या, त्यानुसार आम्ही गेलो.

मग भाईंनी अभिषेक घोसाळकर सांगितलं, की आयसी कॉलनीच्या शाखेमध्ये या. तिथे मॉरिस साड्यांचे वाटप करणार आहे, अस समजलं. तेवढ्यात अचानक लाईट गेले. पूर्ण काळोख झाला. आम्ही आत बसलेलो, लाईट अचानक कसे गेले कळत नव्हतं. भाई शाखेच्या बाहेर उभे होते. तेव्हा मॉरिसने सांगितलं, की सगळ्या महिलांना आत बोलाव.

इतक्यात मॉरिसने अभिषेक भाईंना त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावले. दो मिनिट के लिये भाई जरा इधर आओ, इंटरव्ह्यू लेना है. नंतर प्रवीण नावाचा कार्यकर्ताही भाईंसोबत गेला. तो म्हणालाही की, भाई क्यू जाना है इंटरव्ह्यू के लिये? तर ते म्हणाले, चल दो मिनिट के लिये बुलाया है तो जाके आते है. मात्र आतमध्ये गोळीबार झाला.