सलग दोन पराभवानंतर मुंबई इंडियन्सला मोठा झटका, BCCI ने दिलेल्या बातमीने हार्दिक पंड्याचे टेंशन वाढले…

आयपीएलच्या सामन्याला सध्या सुरुवात झाली आहे. यामध्ये सूर्यकुमार यादव काही महिन्यांपासून दुखापतीमुळे मैदानाबाहेर आहे. आयपीएलच्या पहिल्या दोन लढतीत तो खेळू शकला नाही. सूर्या रिकव्हरीसाठी बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आहे. त्याच्याबाबत आता एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला पहिल्या दोन सामन्यात सूर्यकुमार यादवची कमतरता जाणवली. पण बीसीसीआयने त्याच्याबाबत कोणताही धोका न पत्करण्याचे ठरवले आहे. जून महिन्यात वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी-२० वर्ल्डकप होणार आहे. तेव्हा तो उपलब्ध होण्यावर भर दिला जाणार आहे.

या स्पर्धेत सूर्या टीम इंडियाचा हुकमी एक्का असेल. सूर्यकुमार यादववर स्पोर्ट्स हर्नियाची सर्जरी झाली आहे. तो अद्याप पूर्णपणे फिट झालेला नाही. यामुळे कोणतीही रिस्क घेतली जाणार नाही. सूर्याचा फिटनेस चांगला आहे आणि लवकरच मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसले.

तो सध्या सुरुवातीचे दोन सामने तो खेळू शकला नाही आणि आणखी काही लढती तो खेळू शकणार नाही. यामुळे मुंबईसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, बीसीसीआय खरी काळजी ही आहे की सूर्या टी-२० वर्ल्डकप खेळू शकेल की नाही. यामुळे त्याला विश्रांतीच दिली जाणार आहे.

सूर्या वर्ल्डकपच्या आधी फिट होईल यासाठी बीसीसीआयचे प्रयत्न सुरू आहेत. सूर्यकुमार यादवच्या फिटनेसची बातमी आल्याने मुंबई इंडियन्स आणि कर्णधार हार्दिक पंड्याच्या टेन्शन आणखी वाढले आहे. मुंबईने पहिले दोन्हीही सामने गमावले आहेत.

दरम्यान, आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा पहिल्या लढतीत गुजरातकडून तर दुसऱ्या लढतीत हैदराबादकडून पराभव झाला आहे. तिसरी लढत घरच्या मैदानावर वानखेडेवर राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणार आहे. यामुळे या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.