राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा आज निवडणूक आयोग जाहीर करणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामुळे खऱ्या आर्थाने आज विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे.
असे असताना राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेची प्रतीक्षा सर्व राजकीय पक्षांकडून उत्सुकतेने केली जात आहे. असे असताना एक राजकीय बातमी समोर आली आहे. भंडाऱ्यामध्ये काँग्रेसने भाजपला मोठा धक्का दिला आहे.
भाजपचे माजी खासदार शिशुपाल पटले हे आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते ते आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिशुपाल पटले हे 2004 मध्ये भाजपाकडून निवडूण आले होते. त्यांनी प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता, यामुळे ते एक दिग्गज नेते म्हणून ओळखले जातात. खासदार शिशुपाल पटले यांचा आज काँग्रेसमध्ये अधिकृतरित्या प्रवेश होणार आहे. त्यांच्यासोबत अनेक समर्थक देखील काँग्रेस मध्ये प्रवेश करणार आहेत.
ते आज मुंबईमध्ये नाना पटोले यांच्या हस्ते पक्ष प्रवेश करणार आहेत. खासदारकीनंतर ते भाजपाच्या अनेक मोठ्या पदावर कार्यरत होते. पण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्र व राज्य सरकार आपले म्हणणे ऐकत नाही, म्हणून त्यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भाजपला हा एक मोठा धक्का मानला जात आहे.
शिशुपाल पटले यांच्यामुळे पोवार समाजातील नेतृत्व भाजपाने गमावले असल्याची चर्चा आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस तुमसर विधानसभेतून शिशुपाल पटले यांना मैदानात उतरवणार का हे पाहाण महत्त्वाचं ठरणार आहे? तशी तयारी सुरू आहे.