लोकसभेसाठी सध्या उमेदवार जाहीर केली जात आहे. आता काँग्रेसच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर झाली आहे. यामुळे राज्यात कोणाची उमेदवारी जाहीर झाली याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत राज्यातील जवळपास सात नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.
यामध्ये पुण्यातून रवींद्र धंगेकर यांचे नाव फायनल झाले आहे. त्यामुळे आता पुण्यातून भाजपचे मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर अशी लढत होणार आहे. यामुळे राज्यात या लढतीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. याचे कारण म्हणजे धंगेकर यांनी विधानसभा पोट निवडणुकीत पुण्यात मोठा इतिहास घडवत विजय मिळवला होता.
दरम्यान, लोकसभेसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर झाली आहे. या यादीत पुण्यातून रवींद्र धंगेकर, गडचिरोलीतून नामदेव किरसंड, सोलापूरमधून प्रणिती शिंदे, अमरावतीमधून बळवंत वानखेडे, कोल्हापूरमधून शाहू छत्रपती, नंदुरबार गोपाळ पाडवी, नागपूर विकास ठाकरे अशी नावे आहेत.
याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माहिती दिली आहे. करण्यात आली. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख पुणे लोकसभा मतदारसंघाची होती. सध्या मात्र परिस्थिती बिकट आहे. यातच रवींद्र धंगेकर यांनी पक्षाला पुण्यात जीवदान दिले आहे.
काँग्रेसचे सुरेश कलमाडी यांनी पुणे लोकसभेसाठी अनेक वर्षे पुण्यातून खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले. नंतर मात्र भाजपने हा गड ताब्यात घेतला. दरम्यान, जागा वाटपाच्या अंतिम निर्णयाबाबत मुंबईत महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठकीत होणार आहे.
तत्पूर्वीच काँग्रेसच्या दिल्लीतील बैठकीत महाराष्ट्रात 18 जागा लढवण्याच्या निर्णयावर निर्णय झाल्याची माहिती काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी दिली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेक ठिकाणी उमेदवार फायनल झाले आहेत.