राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठी दिलासादायक बातमी मिळाली आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मागणीला मान्यता दिली आहे. यामुळे पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्षाला लोकसभा निवडणुकीत वापरलेलं तुतारी चिन्ह आगामी विधानसभा निवडणुकीतही वापरता येणार आहे.
आता आगामी विधानसभा निवडणुकीतही शरद पवार गटाचे आता तेच चिन्हं असणार आहे. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे आता शरद पवार यांच्या पक्षाला आता देणगी स्वीकारता येणार आहे. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निवडणूक आयोगाने तशी अधिकृत मान्यताच पक्षाला दिली आहे. त्यामुळे शरद पवार गटाला खूप मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे कार्यकर्ते खुश झाले आहेत. निवडणूक आयोगासमोर आज याबाबत सुनावणी पार पडली. या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
या सुनावणीत शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्षाला देणगी स्वीकारण्यास मान्यता मिळाली आहे. शरद पवार गटासाठी हा मोठा दिलासा आहे. आज आमच्या चार वेगवेगळ्या महत्त्वाच्या सुनावण्या दिल्लीत होत्या. शरद पवार यांचा पक्ष ज्याप्रकारे काढून घेण्यात आला, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
जनतेने आम्हाला आशीर्वाद दिले त्याबद्दल आभार. आम्हाला तुतारी हे चिन्ह तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आलं होतं. पण आम्हाला चेक घेण्याचा अधिकार नव्हता. तसेच टॅक्स बॅनेफिट मिळत नव्हता. तर आता आमची विनंती मान्य करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले आहे. आता पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तयारी करत आहे.
दरम्यान, आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आता कलम 29 ब नुसार देणगी स्वीकारता येणार आहे. यापुढे शरद पवार यांच्या पक्षाला देणगी स्वीकारण्यासाठी अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.