मोठी बातमी! ईडीकडून आमदार रोहित पवार यांचा कारखाना जप्त, राज्याच्या राजकारणात खळबळ…

सक्तवसुली संचानालय अर्थात ईडीकडून बारामती अ‍ॅग्रोची प्रॉपर्टी जप्त करण्यात आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची चौकशी सुरू होती. आता मात्र कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाईत एकूण १६१ एकर जमीन ईडीने जप्त केली आहे. जपवळपास ५०.२० कोटी रुपयांची ही मालमत्ता असल्याची माहिती समजत आहे. बारामती अ‍ॅग्रो ही शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या मालकीची कंपनी आहे. यामुळे आता राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे.

रोहित पवार यांचा बारामती अ‍ॅग्रो कंपनीने खरेदी केलेला कन्नड सहकारी साखर कारखाना ईडीने जप्त केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीआधी ईडीची ही सर्वात मोठी कारवाई आहे. ईडीने शिखर बँक घोटाळा प्रकरणी ही कारवाई केली आहे. याबाबत चौकशी सुरू आहे.

या प्रकरणी गेल्या अनेक दिवसांपासून ईडीची कारवाई सुरु होती. ईडीने या प्रकरणी अनेक ठिकाणी छापेमारी देखील केली. त्यानंतर आता कन्न सहकारी साखर कारखाना जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे. यावर आता रोहित पवार काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ईडीने शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी कन्नड सहकारी साखर कारखाना जप्त केला आहे. या जप्त केलेल्या कारखान्याची किंमत ही ५० कोटी २० लाख इतकी आहे. या प्रकरणी १६१ एकर जमीन ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात सर्वात आधी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणात राष्ट्रवादीचे अनेक नेते आरोपी बनवण्यात आले होते. रोहित पवार यांचीसुद्धा जवळपास 3 दिवस चौकशी झाली होती. सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात आल्यानंतर ईडीकडून कन्नड सहकारी साखर कारखाना जप्त करण्यात आला आहे. रोहित पवार गेल्या अनेक दिवसांपासून सरकारवर टीका करत आहेत.

दरम्यान, कन्नड सहकारी साखर कारखाना खरेदी करताना शिखर बँकेने जी प्रक्रिया राबवली होती ती चुकीची होती असं ईडीने म्हटलं होतं. त्यानंतर ईडीने ही कारवाई केली आहे. यामुळे आता राज्यातील राजकिय वातावरण चांगलेच तापले आहे.